Sarsenapati Hambirrao :   महाराष्ट्र राज्यात उध्दव ठाकरे सरकारने सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे.  


सरसेनापती हंबीरराव मोहीते या चित्रपटाची कथा म्हणजे स्वराज्याचा इतिहास आहे फक्त स्वराज्याचा इतिहास नाही तर संपुर्ण महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्य सरकारला आमची विनंती आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री करावा म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील, असं सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे. 


'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनीनं छत्रपती शिवाजी महाराजा यांची भूमिका साकारली आहे. तर प्रविण तरडे स्वतः ‘सरसेनापती हंबीररावां’ची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. 27 मे 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाली आहे. 'परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट ..'  या चित्रपटातील डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. 


‘बाहुबली’नेही केलेय कौतुक!


या चित्रपटाच्या टीझरला ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली होती. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले. ‘बाहुबली’ला देखील या चित्रपटची उत्सुकता आहे.


हेही वाचा :