Johnny Depp, Amber Heard : अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard)  आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप (Johnny Christopher Depp) यांचे आयुष्य एका नवीन वळणावर आले आहे, जिथून या दोघांनाही आता मागे वळून पाहायचे नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या मेसेजमध्ये, एम्बर हर्डने असे म्हटले आहे की, ‘व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये $ 100 दशलक्ष मानहानीच्या खटल्यात पुन्हा एकदा डेपसोबत घालवलेले क्षण समोर येतील, ज्यामुळे अस्वथ वाटत आहे.’


अभिनेत्री एम्बर हर्डने इंस्टाग्रामवर तिचे एक मोठे वक्तव्य पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तिने लिहिलेय की, तुम्हाला माहिती आहे की, मी व्हर्जिनियामध्ये राहणार आहे, जिथे मी माझा माजी पती जॉनी डेपचा सामना करणार आहे. हर्ड म्हणते की, 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्यापूर्वी, ती माजी पती जॉनी डेपसोबत घालवलेला क्षण अजिबात आठवू इच्छित नाहीय.



मानहानीच्या खटल्याला सुरुवात


अभिनेत्री सोमवारपासून तिचा माजी पती जॉनी डेप याच्या विरुद्ध खटल्याची तयारी करत आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'जेव्हा डेपसोबत हे प्रकरण संपेल, तेव्हा मी पुढे जाऊ शकते आणि जॉनी देखील. जेव्हा आम्ही दोघे एकत्र होतो, तेव्हा आमच्यात खूप प्रेम होते. पण, आता हळूहळू सर्व काही संपले आहे.’


अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप हे सुंदर जोडपे परस्पर वादांमुळे बरेच दिवस चर्चेत होते. एम्बर हर्डने माजी पती जॉन डेप विरुद्ध $100 दशलक्ष मानहानीचा दावा दाखल केला आहे. हर्ड आणि डेप यांच्यातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या मेसेजमध्ये, अभिनेत्रीने सांगितले की, व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये हा खटला सुरू आहे.


मागील आयुष्य आठवते तेव्हा...


हर्डने आपल्या पोस्टमध्ये जॉनीला ‘चूक’ म्हटले आहे. ती म्हणाली, माझ्यासोबत झालेल्या हिंसाचार आणि घरगुती अत्याचार याविरुद्ध मी आवाज उठवला आहे. पुरुषांच्या विरोधात बोलण्याची महिलांना किती किंमत मोजावी लागते, तितकीच किंमत मी जॉनीकडे मागितली. हर्ड म्हणाली की, जेव्हा हे प्रकरण संपेल, तेव्हा जॉनी आणि मी दोघेही स्वतंत्र मार्गाने जाऊ शकतो. मी नेहमी जॉनी डेपवर प्रेम केले आहे आणि जेव्हा मला माझे मागील आयुष्य आठवते तेव्हा मला खूप त्रास होतो.


अमेरिकन अभिनेत्री हर्डने जानेवारी 2021 मध्ये तिच्या पती डेपच्या वकिलाने कोर्टात केलेल्या विधानांसाठी 10 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. हा खटला कॅलिफोर्निया न्यायालयात हस्तांतरित करण्याचा त्यांचा प्रस्ताव न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही बाब पुढे आली. हर्ड आणि डेप यांच्यातील भांडण 2016 मध्ये सुरू झाले. 2016 मध्ये हर्डने डेपवर शारीरिक शोषणाचा आरोप केला होता.


एम्बर लॉरा हर्ड एक अमेरिकन चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तर, जॉन क्रिस्टोफर डेप हा देखील एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि संगीतकार आहे. तीन अकादमी पुरस्कारांव्यतिरिक्त गोल्डन ग्लोब अवॉर्ड, स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड यासह अनेक पुरस्कारांचा तो मानकरी आहे.


हेही वाचा :


Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Beast : थलापती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांना फटका; कुवेतनंतर आता 'या' देशांमध्ये देखील बॅन