Santosh Juvekar On Akshaye Khanna: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. 'छावा'मध्ये अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली. त्यापैकी एक नाव म्हणजे, संतोष जुवेकर (Santosh Juvekar). सध्या संतोष नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरनं 'छावा'मध्ये मुघलांची भूमिका साकारणारे कलाकार आणि औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाबाबत एक वक्तव्य केलं होतं. "मी अक्षय खन्नाकडे (Akshaye Khanna) पाहिलंही नाही, त्याच्याशी बोलायची इच्छाच झाली नाही, असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच संतोष जुवेकर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. अशातच आता संतोष जुवेकरनं आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नुकताच संतोष जुवेकर होळीनिमित्त कलाकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं मुंबई तकसोबत संवाद साधला.'छावा'मुळे तुझ्यात काय बदल झाला? यावर बोलताना संतोष म्हणाला की, "अजून खूप वेळ आहे. पण मी प्रयत्न करतोय की, काही गोष्टींना, ज्या गरजेच्या नाहीत त्यांना आपल्यापासून लांब ठेवायचं. ज्या मला हव्याहव्याशा वाटतात, ज्या माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्या व्यक्तींना त्या गोष्टींना माझ्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय."
"खरं तर या विषयावर मला बोलायचं नाही. लोक म्हणतात की, काय सारवासारव करतो... आला मोठा शहाणा... शहाणपणा शिकवायला. माझ्यातल्या कलाकारावर संतोष जुवेकर हावी झाला. ज्याची आपल्या महाराजांवर आपुलकी, आस्था आहे. मी कादंबरी वाचली आहे. त्यामुळे माझ्यावर कदाचित प्रभाव पडला असेल. जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली, त्यापेक्षा जी पोहोचली नाही ती मला सांगायची आहे. तो राग फक्त त्या भूमिकेचा होता. कारण, अक्षय खन्नाचा मीदेखील तेवढाच फॅन आहे. ही सारवासारव नाहीये. पण, खरंच माझं प्रेम आहे. कारण, इतकं सुंदर त्या माणसाने काम केलंय ना की, त्याचा राग यावा...", असं संतोष जुवेकर म्हणाला.
माझं वक्तव्य म्हणजे, अक्षय खन्नाच्या कामाची पावती : संतोष जुवेकर
"लहानपणी आपली आई किंवा आजी निळू फुले किंवा एखाद्या व्हिलनला शिव्या द्यायचे. की हा नालायक आहे. पण, ते त्या भूमिकेसाठी असायचं. त्या माणसाची ती पावती होती. पुरुष नाटकात नाना पाटेकरांना एका बाईने प्रयोग सुरू असताना चप्पल फेकून मारली होती. नानांनी ती चप्पल परत दिली नव्हती. ते म्हणाले होते की, ते माझं अवॉर्ड आहे. मला वाटतं की, हीदेखील अक्षय खन्नाच्या कामाची पावती आहे की, त्यानं 100 टक्के देऊन, ते पात्र उभं केलं.", असं संतोष जुवेकर म्हणाला.
मी बोललो ते चुकीचं नाही बोललो : संतोष जुवेकर
संतोष जुवेकर पुढे बोलताना म्हणाला की, "मी बोललो ते चुकीचं नाही बोललो. पण, ते चुकीच्या अर्थानं घेतलं गेलं. यासाठी मला असं वाटतं की, मी का बोललो? कारण, माझं म्हणणं लोकांनी वेगळ्या अर्थानं घेतलं. आपण कोणाचेही विचार बदलू शकत नाही. मारणारा हात आपण थांबवू शकतो, बोलणारं तोंड नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :