Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Sanjay Dutt on Illegal Weapons: 'चूक माझीच होती'; संजय दत्तने सांगितला त्या निर्णयाचा पश्चात्ताप

Sanjay Dutt Illegal Weapons Case: संजय दत्त (Sanjay Dutt) याचं आयुष्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अंमली पदार्थ ते तुरुंगवास, या अभिनेत्याने आपल्या आयुष्यात सर्व काही अनुभवले आहे. अभिनेत्याच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त काळ म्हणजे 1993 साली झालेला सीरिअल बॉम्ब ब्लास्ट (Bomb Blast). त्याच्यावर आपल्या घरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप होता. या गुन्ह्याखाली अभिनेत्याला तुरुंगवासही (Jail) भोगावा लागला. बरेच वर्षे संजय दत्त या शिक्षेसाठी तुरुंगवास भोगत होता. नेमकं प्रकरण काय? अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.
संजय दत्तला घरात बेकायदेशीर शस्त्र ठेवल्याबद्दल झाला होता पश्चाताप (Sanjay Dutt Opens Up About Illegal Arms Case)
बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला होता. आता संजय दत्तने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत या घटनेची आठवण करुन दिली. संजय दत्तने नुकतंच, 'शेखर टुनाईट'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शेखर सुमनसमोर त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या वेळी अभिनेत्याने 1993 साली मुंबई साखळी घटस्फोटाची आठवण काढली. या मुलाखतीत अभिनेत्याने कबूल केले की, त्यावेळी त्याच्याकडून चूक झाली होती. जर त्याने आपल्या मनाचे ऐकले असते, तर कदाचित त्याने असे पाऊल उचलले नसते, असं संजय दत्त म्हणाला.
'शेखर टुनाईट'ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला की, 'चुकी माझी होती. जर तुमचं दृदय ही गोष्ट करण्यास नकार देत होती. तर, तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे होतं. जेव्हा ती घटना घडली आणि काय घडत आहे हे मी पाहिलं, तेव्हा माझ्या मनाने ते करु नकोस असं सांगितलं होतं. पण जेव्हा मी डोक्याने विचार केला तेव्हा म्हटलं की, एकच आठवड्याचा प्रश्न आहे, ठेवूयात. यामुळे जास्तीत जास्त काय बिघडणार आहे?', असं संजय दत्त म्हणाला. 'मी घेतलेल्या निर्णयाचे इतके गंभीर परिणाम होऊ शकतात, याची मला कल्पना नव्हती. प्रत्येकजण ज्या देशात राहत आहे, तेथील कायद्यांविषची नागरिक जागरुक असायला हवे', असंही संजय दत्त म्हणाला.
'जेव्हा पोलीस मला बेड्या घालत होते, तेव्हा माझे वडील प्रचंड रडत होते. आपल्या मुलासोबत नेमकं काय घडतंय, याचा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, मी वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही केवळ एक प्रक्रिया असून काळजी करण्याचं कारण नाही', असं म्हणत संजय दत्तने आपल्या वडिलांना धीर दिला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























