KGF Chapter 2 : दिग्दर्शक प्रशांत नील यांचा 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन केवळ चार दिवस झाले आहेत. तरी देखील जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 552 कोटी रूपयांची कमाई केली आहे. पुष्पा, आरआरआर आणि केजीएफ-2 या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.'साऊथ चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर एवढे हिट का ठरतात?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये अभिनेता संजय दत्तला विचारण्यात आला. यावेळी संजयनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 


संजयनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला वाटतं बॉलिवूड हे हिरोइजम विसरत आहे. पण साऊथ चित्रपटसृष्टी ही हिरोइजम विसरली नाही. आपण विसरलो आहोत की उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि राजस्थान येथे आपला ऑडियन्स जास्त आहे. मी अशी आशा करतो की बॉलिवूडमध्ये देखील हिरोइजम हा ट्रेंड पुन्हा येईल. कॉर्पोरेट ट्रेंड चांगला आहे. पण प्रेक्षकांच्या पसंती देखील लक्षात घेतली पाहिजे. '


केजीएफ- 2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात संजयन खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता यशनं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. मालविका अविनाश ,श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.  विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


हे देखील वाचा-