Sanjay Dutt Aakhir Tumhein Aana Hai song : फिरोज खान यांचा ‘यलगार’ हा सिनेमा 1992 साली प्रदर्शित झाला होता.  या सिनेमात फिरोज खान यांनी आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून एक नवख्या अभिनेत्याला इंडस्ट्रीत लॉन्च केलं. आपल्या पहिल्याच सिनेमातून विक्की अरोरा एकाच रात्रीत स्टार बनले. मात्र त्याची कारकीर्द फार काळ चालली नाही.  या हिट सिनेमानंतर विक्की सिनेसृष्टीपासून दूर झालेला पाहायला मिळाला. या चित्रपटात संजय दत्तची सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत होता. पण दिग्दर्शकाने विक्कीला संजयपेक्षाही मोठी भूमिका दिली होती. दरम्यान, सध्या या सिनेमातील "Aakhir Tumhein Aana Hai" हे गाणं चर्चेचा विषय बनलंय. कारण संजय दत्त आणि नगमाचं हे रोमँटिक गाणं आहे. मात्र, संजय दत्त या गाण्यात कुंफू-कराटे करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे संजय दत्तच्या या डान्सचं नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सुरु आहे. 

Continues below advertisement



'यलगार’ हा सिनेमा फिरोज खान यांनी दिग्दर्शित केली होती. या चित्रपटातील “हो जाता है कैसे प्यार” हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. देखण्या तरुण विक्की अरोराने या गाण्यात सर्वांचं मन जिंकलं. या गाण्यात ते मनीषा कोईरालासोबत डान्स करताना दिसले होते. या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं, पण त्यानंतर त्यांचं फिल्मी करिअर पूर्णपणे कोसळलं. ही त्यांची पहिली आणि शेवटची फिल्म ठरली.


दिग्दर्शकाच्या बहिणीमुळे मिळाली हिरोची संधी?


मीडिया रिपोर्टनुसार, विक्की अरोडा शिक्षणासाठी मुंबईत आले होते. कॉलेजच्या काळापासूनच ते मॉडेलिंग करत होते. त्या काळात त्यांनी अनेक प्रसिद्ध ब्रँडचे असाइनमेंट्स सुद्धा मिळवले होते. असं म्हटलं जातं की ज्या कॉलेजमध्ये फरदीन खानची बहीण लैला खान होती, त्याच कॉलेजमध्ये विक्की सुद्धा होते. फिरोज खान जेव्हा ‘यलगार’साठी लीड हिरो शोधत होते, तेव्हा लैलाने त्यांना विक्कीबद्दल सांगितलं आणि मग विक्कीला ही फिल्म मिळाली व तो हिरो बनला.


तिन्ही खानना मागे टाकून मिळाली संधी


फिरोज खान यांच्या या चित्रपटासाठी विक्की पहिली पसंती नव्हते. यापूर्वी फिरोज खान यांनी ही फिल्म शाहरुख, सलमान आणि आमिर यांच्याशीसुद्धा बोलून पाहिली होती, पण काही जमलं नाही आणि शेवटी ही संधी विक्कीच्या वाट्याला आली. यानंतरही त्यांनी अनेक अभिनेत्यांशी संपर्क केला, पण कुठेच काही ठरलं नाही. शेवटी त्यांनी एक नवखा अभिनेता निवडला आणि तो रातोरात स्टार झाला.





 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


ह्रदयी वसंत फुलताना प्रमास रंग यावे, जान्हवी किल्लेकर पुन्हा थिरकली, डान्स VIDEO व्हायरल


जिनिलीयाच्या वाढदिनी रितेश देशमुखची 300 शब्दांची खास पोस्ट, म्हणाला, 'माझी बायको..'