एक्स्प्लोर

'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा

पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Sandeep Pathak: राज्यात दुष्काळाचा दाह गावागावात पोहोचला आहे. जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. जगणं कष्टाचं होऊ लागलं आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना अभिनेता संदीप पाठक यांनी नागरिकांना पाणी बचतीचं आवाहन केलंय. “तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल,” असा इशारा देत त्यांनी पाण्याचं महत्त्व ओळखून प्रत्येकाने त्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत पाणीटंचाईचं संकट गडद होत असताना संदीप पाठक यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संदीप पाठक?

“त्यांनी हे केलं नाही, आम्ही हे केलं, असे हेवेदावे करण्याची ही वेळ नाही,” असं म्हणत संदीप पाठक यांनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं. प्रत्येक नागरिकाने पुढील वर्षभर पाणी वाचवण्याचा आणि इतरांनाही पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे, असं ते म्हणाले. पाणी ही केवळ वर्तमानातील गरज नसून भविष्यातील मोठं आव्हान ठरू शकतं. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं, अनावश्यक वापर टाळणं आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनाही पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ सरकारच्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. पाणी बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असा संदेश अभिनेता संदीप पाठक यांनी म्हटलं.

राज्यभरात दुष्काळाचा चटका वाढला!

दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही, मात्र डोक्यावरचं कर्ज आणि घरखर्चाची जबाबदारी कायम आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. राज्यभरात दुष्काळाचा दाह वाढतो आहे. जलस्त्रोत आटले आहेत. धरण कोरडीठाक पडली आहेत. हातात उंडाशी आलेला घास करपून गेला आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांवर मोठी कठीण वेळ आली आहे. गावोगावी पंचनामे सुरू आहेत. पिण्यासाठी पाणी आणायचं कुठून?असे प्रश्न आ वासून उभे ठाकले आहेत.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणानंतर पोलीस ऑन अलर्ट मोड; सलमान-आमीर खानच नाही, तर 'या' बॉलिवूड कलाकारांच्या घरांचीही केली रेकी
टायगर श्रॉफ प्रकरणानंतर पोलीस ऑन अलर्ट मोड; सलमान-आमीर खानच नाही, तर 'या' बॉलिवूड कलाकारांच्या घरांचीही केली रेकी
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
Ashok Saraf on Nana Patekar: अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Embed widget