Samrenu Official Teaser : ‘सुरूवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘समरेणू’ (Samrenu) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. एम आर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश डोंगरे (Mahesh Dongre) यांनी केले आहे.


सूरज आणि धीरज यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांना गुरू ठाकूर (Guru Thakur) आणि क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे.  धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एम आर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. 



‘समरेणू’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप समोर आली नसली तरी टिझरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. सुरूवात महत्वाची नसलेल्या या प्रेमकहाणीचा शेवट काय असणार आहे, हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ‘समरेणू’ 13 मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha