The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाबाबत रोज नवनवीन वक्तव्ये आणि वाद पाहायला मिळत आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) आरोप केला होता की, 'द कपिल शर्मा शो'च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला, कारण हा व्यावसायिक चित्रपट नसून, 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा आम्ही सांगितली होती. तसेच कोणत्याही मोठ्या अभिनेत्याने यात काम केलेले नाही. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेते अनुपम खेर  यांनी खुलासा केला आहे.


'द कश्मीर फाईल्स' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) म्हणाले, 'खरं खरं सांगायचं तर मला शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मी हरमन, जो माझा मॅनेजर आहे, त्याला सांगितले की, हा चित्रपट खूप गंभीर आहे, त्यामुळे मी कॉमेडी कार्यक्रमात जाऊ शकत नाही. दोन महिन्यांनपूर्वीच मला याचं आमंत्रण मिळालं होतं.’


त्याच्या मनात वाईट भावना नसावी : अनुपम खेर


एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, मी या शोमध्ये काही वेळा आलो आहे आणि हा खूप मजेदार शो आहे. मला वाटत नाही की, कपिलच्या मनात आपल्याबद्दल किंवा आपल्या चित्रपटाबद्दल काही चुकीची भावना नाहीये. यापूर्वी, जेव्हा एका चाहत्याने विवेक अग्निहोत्रीला कपिल शर्मा शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करावे असे सांगितले, तेव्हा कपिलने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते.


विवेक अग्निहोत्रींचे आरोप चुकीचे?


आपल्या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना विवेक म्हणाले होते की, 'आमच्याकडे बडे अभिनेते नसल्याने त्यांनी आम्हाला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे.'  यानंतर ट्विटरवरून अनेकांनी या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पण, यावेळी मुलाखतीला अनुपम खेर यांच्यासोबत उपस्थित असलेल्या विवेक यांनी अभिनेत्याच्या मुद्यांचे समर्थन केले आणि म्हटले की, ‘नाही, मला वाटत नाही की, त्याच्या मनात आमच्याबद्दल किंवा चित्रपटाबद्दल वाईट भावना आहेत.’ अनुपम खेर यांच्या मुलाखतीची क्लिप इंटरनेटवर शेअर करताना कपिल शर्माने (Kapil Sharma) लिहिले, ‘धन्यवाद पाजी. माझ्यावर लावलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करण्यासाठी.’



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha