एक्स्प्लोर

Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?

Samarth Marathi Movie: टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध, या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

Samarth Marathi Movie: समर्थ रामदास स्वामींच्या (Samarth Ramdas Swami) प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या 'समर्थ' (Samarth) या आगामी मराठी चित्रपटाचा (Marathi Cinema) बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आधुनिक जीवनातील धावपळ, कुटुंबातील मतभेद आणि अध्यात्मातून जीवनाला मिळणारी नवी दिशा यांची भावस्पर्शी झलक या टीझरमधून (Samarth Marathi Movie Teaser) पाहायला मिळते.

टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणारे अनपेक्षित वळण उलगडताना दिसते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणाऱ्या वडिलांचा प्रवास, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाचा त्याला असलेला विरोध, या दोन पिढ्यांतील संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची योग्य दिशा देणारे आहेत, हे टीझर सूचकपणे अधोरेखित करतो.

या विचारांचा या कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का? समर्थांच्या शिकवणीतून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत.

दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणतात, "समर्थ' हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला स्वतःची वाटेल, असा आम्हाला विश्वास आहे."

निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, "समर्थ' हा चित्रपट म्हणजे दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा एक प्रयत्न आहे. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्ये यांचा सुंदर समतोल साधणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक पिढीला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडणारा हा चित्रपट ठरेल, असा मला विश्वास आहे."

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित 'समर्थ' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक संदर्भात घेतलेला हा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल.

या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

'समर्थ' सिनेमाचा टीझर पाहिलात?

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
Shraddha Kapoor First Reaction On Etha Movie: 'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?
'स्त्री 2 नंतर बऱ्याच ऑफर्स आल्या, भरमसाठ पैसेही दिले, पण...'; श्रद्धा कपूरनं बड्या ऑफर्स नाकारून 'ईठा'ला होकार का दिला?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget