Samantha Ruth Prabhu : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने समंथाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळवून दिली आहे. अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथा प्रचंड चर्चेत आली होती. आयुष्यातील एका नव्या वळणानंतर आता समंथा स्वतःला अधिकाधिक वेळ देत आहे. दरम्यान अभिनेत्री तिची फिरण्याची आवड जोपासत आहे.   


समंथा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर ट्रॅव्हल स्टोरी अपडेट करत असते. तिने शूट केलेल्या जागा अतिशय आर्कषक आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध अशा असतात. नुकतीच समंथाने केरळमधील अथिरप्पिल्ली धबधब्याला भेट दिली आणि चाहत्यांसाठी तिच्या इंस्टाग्रामवर याचे आकर्षक फोटोसुध्दा शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहीले की, ‘तुम्ही जीवनाचा आनंद घ्या, किंवा ते जसं आहे तसं जगा. जीवन वाहत्या नदीसारखे असते, जसे भरती-ओहोटीला पाणी वाढते आणि कमी होते.’


पाहा पोस्ट :



‘बाहुबली धबधबा’ म्हणून ओळखले जाते ‘हे’ ठिकाण!


भारतात 80च्या दशकांत धबधब्यांचा शोध घेणे सुरू झाले. काही काळाने सरकारने या प्रदेशात जलविद्युत प्रकल्पास सुरूवात केली. तोपर्यंत हा धबधबा फक्त स्थानिक लोकांनाच माहीत होता. विद्युत प्रकल्प सुरू झाल्यापासून हे एक प्रसिध्द पर्यटन स्थळ बनले आहे.


या ठिकाणी अनेक चित्रपटांचा शूटिंगही झाले आहे.1986मध्‍ये प्रसिद्ध तमिळ चित्रपट ‘पुन्‍नागाई मन्‍ना’ (Punnagai Manna) या चित्रपटात हा धबधबा सर्व प्रथम दाखवला होता. त्यानंतर अनेक चित्रपटात हा धबधबा दिसला. मणिरत्नमचा गुरू(Guru), दिल से (Dil Se), रावण (Raavan), बाहुबली(Bahubali) यांसारख्या चित्रपटांचेही शूटिंग या ठिकाणी करण्यात आले. ‘बाहुबली’ या चित्रपटातील गाण्यानंतर याला लोक ‘बाहुबली धबधबा’ म्हणून ओळखू लागले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha