एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu: कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना समंथाचं सणसणीत उत्तर, म्हणाली ‘स्त्रीयांना कपड्यांवरून...’

Samantha Ruth Prabhu: समंथाने माजी पती आणि अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, ती वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Samantha Ruth Prabhu: ‘साऊथ क्वीन’ प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. समंथा ही अशा कलाकारांपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बिनधास्त आणि उघडपणे मांडते. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी समंथा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री नुकतीच मुंबईत आयोजित क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2022मध्ये सहभागी झाली होती.

यावेळी समंथाने अतिशय बोल्ड आणि सुंदर ड्रेस परिधान केला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये समंथाने हिरव्या रंगाचा डीप नेक लाँग टेल गाऊन घातला होता. अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्रीने तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समांथाचा हा लूक अनेकांना आवडला, तर अनेकांनी तिला तिच्या ड्रेसमुळे प्रचंड ट्रोल देखील केले.

समंथा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

समंथाने माजी पती आणि अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, ती वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अशातच पुन्हा एकदा तिला तिच्या लूकमुळे ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दरम्यान, या सर्व ट्रोलवर अभिनेत्रीने प्रत्युत्तर देत सर्वांना सणसणीत उत्तर दिले आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीवर पोस्ट शेअर करताना समांथाने लिहिले की, 'मला एक महिला म्हणून पहिलाच मला याचे शिक्षण मिळाले आहे की, त्यांना कशा प्रकारे जज केले जाते. महिलांनी काय परिधान केले आहे, त्यांचा रंग, शिक्षण, समाजातील स्थान, त्यांचे व्यक्तिमत्व, त्वचेचा रंग यावरून आपण त्यांना जज करतो. ही यादी वाढतच जाते. एखाद्या महिलेवर तिच्या कपड्यांबद्दल टिप्पणी करणे, हे आपण करू शकतो ही सर्वात सोपी गोष्ट आहे.’

तिने पुढे लिहिले की, 'आता आपण 2022मध्ये आहोत, महिला काय परिधान करतात आणि कशा दिसतात यावरून आपण स्वत:ला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो का? आपले आदर्श दुसऱ्यावर लादून कोणाचाच फायदा झालेला नाही. आपण एखाद्या व्यक्तीला ज्या प्रकारे जाणतो आणि समजून घेतो त्या पद्धतीचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut pn Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget