Salman Khan threat letter case : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
बॉलीवूड कलाकार आणि मुंबईतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीचा प्लॅन
सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता. तसेच बॉलीवूड कलाकार आणि मुंबईतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुलीचा प्लॅन या गँगचा होता, अशी माहिती आता गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही', लॉरेन्स बिश्नोईनं केला होता दावा
सलीम खान यांना मिळालेल्या पत्रामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलीस लॉरेन्सची चौकशी करत होते. त्यावेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं असा दावा केला की, 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही.'
सलमाननं नोंदवला होता जबाब
या प्रकरणात जबाब नोंदवत सलमान म्हणाला होता की, 'लॉरेन्स बिश्नोईला मी गेल्या काही वर्षांपासून ओळखत आहे. पण मी त्याच्या जास्त संपर्कात आलेलो नाही. तसेच जबाब नोंदवत सलमान म्हणाला, धमकीचे पत्र मला मिळालेले नसून माझ्या वडिलांना सलीम खान यांना मिळालेले आहे. सकाळी जॉगिंगसाठी ते गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना हे पत्र मिळालं. माझा कोणावरच संशय नाही.'
हेही वाचा:
- Salman Khan : सलमान, सलीम खान यांना धमकीचे पत्र देणाऱ्यांचा मुंबई पोलिसांना शोध लागणार?
- Lawrence Bishnoi : सिद्धू मुसेवालाची हत्या असो, सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न; तुरुंगातून कारभार चालवतो 28 वर्षांचा 'लॉरेन्स बिष्णोई'!