Salman Khan : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत. 


मुंबई पोलीस पुणे, दिल्ली आणि पालघरला गेले पण तरीही सलमान आणि सलीम खान यांना दिलेल्या धमकीच्या पत्रात कोणतीही प्रगती झाली नाही. मुंबई क्राईम ब्रँच सलमान आणि सलीम खान धमकी पत्र प्रकरणाचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित व्यक्तीच्या शोधात पालघरला गेले.


सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेऊन टीम पालघरला पोहोचली पण त्या संशियत व्यक्तीबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही. पत्र टाकणारे कोण होते आणि प्लॅनिंगमागे कोण आहे आणि कोण राडार वर होते हे संशियत आरोपी अटकेनंतर स्पष्ट होणार आहे असा पुलिस मनाले. या टोळीच्या मुंबईतील सक्रिय सदस्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तपास करून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जसे की ते इन्स्टाग्रामचा वापर कम्युनिटच्या माध्यमातून करत होते आणि बनावट खात्यांद्वारे संवाद साधण्यासाठी वापरत होते.


पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी संतोष जाधव याची चौकशी करणार का? अशी विचारणा केली असता. त्याची चौकशी करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे शहर गुन्हे शाखेने सांगितले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी यापूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या सिद्देश महाकालची चौकशी केली होती. हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आहेत. धमकीच्या पत्रामागे टोळीचा सूत्रधार असल्याचा संशय आहे.


'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही', लॉरेन्स बिश्नोईनं केला होता दावा
सलीम खान  यांना मिळालेल्या पत्रामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई  असल्याचा संशय पोलीसांना होता. पोलीस लॉरेन्सची चौकशी करत होते. त्यावेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं असा दावा केला की, 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही'