NEET PG 2022 Counselling : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NEET PG परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत आता समुपदेशनाची चर्चा सुरू झाली आहे. असं मानलं जातं की, संबंधित प्राधिकरण लवकरच NEET PG समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केली जाईल. संपूर्ण वेळापत्रक MCC वेबसाइट mcc.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल. MCSC ऑल इंडिया कोटा समुपदेशनाच्या चार फेऱ्या आयोजित करेल. यामध्ये फेरी-1, राऊंड-2, मॉप-अप राऊंड आणि स्ट्रे व्हेकन्सी राउंडचा समावेश आहे.
आता NET PG 2022 मध्ये 50 टक्के AIQ जागांसाठी समुपदेशनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. NEET PG समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच बोर्डाकडून जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे. सरकारी संस्था, केंद्रीय विद्यापीठे, डीम्ड युनिव्हर्सिटी, ESIC आणि AFMS संस्थांमधील AIQ जागांसाठी समुपदेशन केले जाईल आणि उर्वरित 50 टक्के जागा संबंधित राज्य प्राधिकरणांच्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे भरल्या जातील.
UP NEET UG Counselling साठी नोंदणीची पद्धत
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर लॉगइन करा.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- दिलेल्या सूचनांमधून तुमचा संबंधित अभ्यासक्रम निवडा.
- NEET UG चा रोल नंबर आणि ई-मेल आयडीसह तपशील प्रविष्ट करा.
- लॉगिन करा आणि तुमचा अर्ज भरा.
- NEET UG समुपदेशन शुल्क भरा.
- पर्याय लॉक करा आणि सबमिट वर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ
यंदा NEET-UG 2022 साठी रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी 2.57 लाख अधिक नोंदणी झाली असून, हा आकडा 18 लाखांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 12 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत 274.3% ची वाढ झाली आहे, तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय यावेळी महिला उमेदवारांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. यंदा या परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI