Salman Khan : सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याचा कोठडीतच मृत्यू झाला. अनुजने तुरुंगातच आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आईने हायकोर्टात याचिका देखील दाखल केली. या याचिकेमध्ये सलमान खानचं देखील नाव टाकण्यात आलं होतं. पण आता मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High Court) सलमान खानला मोठा दिलासा देण्यात आलाय. 


घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नसल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे अनुज थापनच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेतून सलमानचं नाव वगळण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत. घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतमध्ये आरोपीच्या आईने सलमान खानलाही प्रतिवादी बनवलं होतं. पण आता हायकोर्टाकडून सलमानला दिलासा देण्यात आलाय. 


थापनच्या कुटुंबाने केली सीबीआय चौकशीची मागणी


अनुजने तुरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर थापनच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 


अनुज थापनची तुरुंगात आत्महत्या


सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी अनुज थापन याने कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली होती. जेजे रुग्णालयाच्या शवविच्छेदनामध्येही त्याचा मृत्यू  गळफास लावून झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला अनुजच्या कुटुंबीयांनी मुंबईत येऊनही अनुजचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी  या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली. मात्र अनुजच्या आईची प्रकृती लक्षात घेऊन त्यांनी अनुजचा मृतदेह पंजाबला नेण्याची तयारी दर्शवली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. 


मुंबई पोलिसांनी केली होती अटक


सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने  25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू चंदर हा शेती करतो आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने तुरुंगात आत्महत्या केली आहे. 


ही बातमी वाचा : 


 


Murlidhar Mohol : दिल्लीनं दिलादारपणाचा कळस गाठला अन् मंत्रीपदाची माळ..., मुरलीधर मोहोळांसाठी मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट