Murlidhar Mohol :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आणि एनडीएचं सरकार केंद्रात स्थापन झालं. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या या मंत्रिमंडळात राज्यातील 6 खासदारांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावर मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी खास पोस्ट केली आहे. 


मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या सभांमध्येही प्रवीण तरडे यांनी खरमरीत भाषण केलं होतं. त्यांच्या त्या सभेतील भाषणंही तुफान गाजलं. आता मोहोळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही प्रवीण तरडे यांनी त्यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा शपथ घेतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.                 


प्रवीण तरडेंची पोस्ट काय?


प्रवीण तरडे यांनी मोहोळांसाठी एक कविता केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही. कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास.. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्या सारखं वापरतात पण तु ते ताट भरून घेतलंस , पोटभरून रिचवलंस.. कदाचित म्हणुनच कोरोनाच्या महामारीत तु पुण्याला वाचवलंस.'


पुढे म्हटलं की, 'तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली.. तुला लोखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली.. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली. पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतय ही तर फक्तं सुरवात आहे अजुनही “ परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम “ या दैवी संदेशा पासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू . पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो. तुझं खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.'






ही बातमी वाचा : 


Avdhoot Gupte : मराठी गायकावर कोसळला दु:खाचा डोंगर, अवधूत गुप्तेच्या आईचं निधन