एक्स्प्लोर

Salman Khan Friend Death: 'भावा'च्या निधनानं पुरता खचला सलमान खान; डोळ्यात आसवं, भावनांचा बांध फुटला; पोस्ट करत म्हणाला...

Salman Khan Friend Death: गेल्या 42 वर्षांपासून जिवलग मित्र असणाऱ्या सुशील कुमार या सलमानच्या मित्राचे निधन झाल्यामुळे त्याला मोठा धक्का बसलाय.

Salman Khan Friend Death: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) अत्यंत जवळच्या व्यक्तीचा निधन झाल्याची बातमी समोर आलीय. गेल्या चार दशकांपासून भावाप्रमाणे सोबत केलेल्या सलमान खानचा जिवलग मित्र सुशील कुमार (Sushil Kumar) यांचे निधन झाले आहे. मित्राच्या जाण्याने सलमान खानला मोठा धक्का बसलाय. त्याने रविवारी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या जिगरी मित्राला श्रद्धांजली वाहिली. (Salman Khan Friend Death)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे खूप कमी लोक आहेत जे स्वतः पुरता विचार न करता समोरच्यासाठी काहीतरी करायला जातात. इंडस्ट्रीमध्ये सलमान खानच्या मैत्रीविषयी अनेकजण बोलतात. 'मैत्री निभवणारा' अशी त्याची इंडस्ट्रीत खास ओळख आहे. गेल्या 42 वर्षांपासून जिवलग मित्र असणाऱ्या सुशील कुमार या सलमानच्या मित्राचे निधन झाल्यामुळे त्याला मोठा धक्का बसलाय. त्याने instagram वर मित्रासाठी एक खास भावनिक पोस्ट केली आहे.

सलमानची भावासारख्या जिवलग मित्रासाठी पोस्ट

42 वर्षांची मैत्री आठवत सलमान खानने लिहिलं, “हा माणूस गेल्या 42 वर्षांपासून माझ्यासाठी भावासारखा होता. अत्यंत चांगला, दयाळू आणि नेहमी मदतीसाठी तत्पर. कितीही कठीण परिस्थिती असली तरी तो नेहमी हसतमुख, नाचणारा आणि बेफिकीर असायचा. आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक अडचण असली तरी तो म्हणायचा, काही फरक पडत नाही, सगळं ठीक होईल.” मित्राच्या जिद्दीचं कौतुक करत सलमानने पुढे लिहिलं, “त्याचं नाव सुशील कुमार होतं… किंवा किमान 5 मिनिटांपूर्वी तरी होतं. अलविदा भाऊ! तू खर्‍या अर्थाने आयुष्य जगलास आणि मृत्यूशी एका चॅम्पियनसारखी लढाई दिलीस.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

“तुझ्यासाठी अश्रू नाहीत, फक्त आठवणी”

सलमान खान म्हणाला, “भाऊ, तुझ्यासाठी अश्रू नाहीत, फक्त आठवणी आणि हसू आहे. “माझा भाऊ हसत-हसत या जगातून गेला. सगळ्यांनाच एक दिवस जायचं आहे, कधी आणि कसं माहीत नाही, त्यामुळे काहीतरी करून जा,” असं त्यांनी लिहिलं. पोस्टच्या शेवटी त्याने म्हटलं, “आता तुझी सिगारेट आणि व्हिस्की एन्जॉय कर, चीयर्स भाऊ… तुझी खूप आठवण येईल.”

भावनिक फोटो आणि आणखी एक पोस्ट

सलमान खानने मित्र सुशील कुमारसोबतचा एक फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिलीय.काही वेळाने त्याने आणखी एक भावनिक पोस्ट केलीये. जा आता त्याचे डोळे भरून आले आहेत. या पोस्टखाली त्याने लिहिलं, “ज्याला जायचं आहे त्याला कधी थांबवू नका. ज्याने बोलावलं आहे तो घेऊनच जातो. प्रत्येकाला एक दिवस जावंच लागतं. चांगल्या माणसाला लवकर बोलावलं जातं. आणि शेवटी उरतात ते वाईट लोक.”

तो पुढे म्हणाला, “ आनंदी रहा भाऊ… तू या जगातून गेला आहेस. मी तुझ्या पत्नीशी बोललो, तिला माहिती आहे तू तिला कोणासाठी सोडलंस. काश मी रडू शकलो असतो, राग काढू शकलो असतो… पण तुझ्यासाठी एकही अश्रू नाही.” शेवटी त्यांनी लिहिलं, “RIP नाही भाऊ… मजेत राह, चीयर्स!”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 

सलमानच्या आगामी कामाविषयी..

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, सलमान खान लवकरच ‘SVC63’ या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत, ज्यात ते नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन वामशी पेडीपल्ली करत आहेत आणि हा चित्रपट ईद 2027 ला रिलीज होणार आहे. तसेच ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातही ते झळकणार आहेत, ज्यात चित्रांगदा सिंहही आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget