Actor Childhood Photo : फोटोमधील हा क्यूट मुलगा आहे बॉलिवूडचा स्टार; ओळखलंत का?
Bollywood Actor Childhood Photo : बॉलिवूडमधील अभिनेत्याचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Bollywood Actor Childhood Photo : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो. नुकताच बॉलिवूडमधील अभिनेत्याचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. फोटोला कमेंट करत या क्यूट मुलाला ओळखण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा (salman khan) आहे. या फोटोमध्ये सलमान पोज देताना दिसत आहे. गोल्डन बॉलिवूड एरा या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सलमानचा हा बालपणीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
'द कपिल शर्मा शो'मुळे विराट कोहलीला तीन लाख रूपयांचा फटका; तुम्हाला माहितीये का किस्सा?
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर का दिसते स्लिम ट्रिम? जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha