एक्स्प्लोर

Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं

Nagraj manjule on Sairat part 2: 'सैराट 2' बाबत नागराज मंजुळे नेमकं काय म्हणाले?

Nagraj manjule on Sairat part 2 Interview: 2016 साली रिलीज झालेल्या 'सैराट' (Sairat) या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश:  भुरळ घातली.  या सिनेमाने केवळ महाराष्ट्र नाही तर, भारत आणि विदेशातही डंका गाजवला (Entertainment). हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी सिनेमा ठरला.  आजही हा सिनेमा आवर्जून पाहिला जातो.  या सिनेमातील पात्रांना विशेष पसंती मिळाली. विशेष म्हणजे 'आर्ची आणि परशा' ही जोडी तुफान गाजली.   रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.  या सिनेमातून समाजातील कटू सत्य आणि हॅपी एन्डिंग नसणारी प्रेम कथा दाखवण्यात आली होती.  दरम्यान, 'सैराट' या सिनेमाचा रिमेक 'सैराट 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार का?  असे प्रश्न प्रेक्षक आणि चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहे. दरम्यान, याच प्रश्नावर 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'सैराट 2'बाबत नागराज मंजळेंचं मोठं वक्तव्य (Will Sairat 2 release) 

 नागराज मंजुळे सध्या 'खाशाबा' आणि 'फ्रेम' या दोन्ही सिनेमांमुळे चर्चेत आहे. 'खाशाबा'  हा सिनेमा 2027 रोजी  रिलीज होणार आहे. तर, 'फ्रेम' हा सिनेमा 10 जुलै रोजी रिलीज होणार आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त नागराज मंजुळे यांनी  'स्क्रीन'ला मुलाखत दिली होती.  या सिनेमात त्यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी 'सैराट'चा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.

'सैराट' या सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 'सैराट' या सिनेमाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत प्रेक्षकवर्ग आहे. 'सैराट'  या सिनेमाचा सिक्वेल येणार का? या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले, 'सैराट' या सिनेमाची स्टोरी लिहित असताना माझ्या मनात असा विचार आला होता  की,  सिनेमातून जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं, ते खरंतर वास्तवापेक्षा थोडं वेगळं असतं. प्रेमात असताना खऱ्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो', असं नागराज मंजुळे म्हणाले.

'मला यात ड्रामा आणण्याची गरज वाटली नाही.  या कारणास्तव मी वास्तव दाखवणारी गोष्ट दाखवली. खरंतर  या सिनेमाकडे कधीच  एक आव्हान म्हणून पाहिलेलं नाही.  या सिनेमातून जे मला  प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा होता, ते मी केलं', असं नागराज मंजुळे म्हणाले. 'बऱ्याच लव्ह स्टोरीमध्ये हॅपी एन्डिंग दाखवली जाते. परंतु, खऱ्या आयुष्यात दुर्लक्ष केलं जातं. वास्तव मांडणं हाच माझा खरा दृष्टीकोन होता', असंही नागराज यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.

'धडक 2'नंतर 'सैराट 2' येणार का? या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले, ''धडक'नंतर 'सैराट'  या सिनेमाचाही सिक्वेल आला पाहिजे, असं काही नाही. पण, जर चांगली स्टोरी असेल तर, 'सैराट 2' येईल', असं नागराज मंजुळे मुलाखतीत म्हणाले. 'आज अनेक जण 'फँड्री' या सिनेमाच्या सिक्वेलबाबतीत अनेक जण विचारतात. पण सध्या यावर कोणताही विचार केलेला नाही', असंही नागराज मंजुळेंनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget