Chinmayee Sumeet : मराठी कलाविश्वातलही हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून चिन्मयी सुमित (chinmayee sumeet) हिची ओळख आहे. मालिका, सिनेमे अशा अनेक माध्यमातून चिन्मयी कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चिन्मयी ही मुळची औरंगाबादची आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या लेकीने कायमच तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. चिन्मयीने 1996 मध्ये अभिनेता सुमित राघवनसोबत (Chinmayee Sumeet) लग्नगाठ बांधली. त्यांची स्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे. चिन्मयीचे वडिल हे आयएएस ऑफिसर होते, दरम्यान त्यांची साहित्यिक म्हणूनही ख्याती होती. दरम्यान चिन्मयीच्या शाळेतील काही आठवणी चिन्मयीने शेअर केल्या आहेत. 


चिन्मयीने नुकतच आरपार ऑनलाईन या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चिन्मयीने वडिल आयएएस असतानाचे काही भन्नाट किस्से सांगितले आहेत. दरम्यान चिन्मयी आणि सुमित हे कायमच चर्चेत राहणारं कपल आहे. दरम्यान या जोडप्याच्या एका निर्णयाचं कायमच कौतुक केलं जातं. सुमीत राघवन हा मुळचा दाक्षिणात्य असला तरी तो मराठी माणसापेक्षाही  अस्स्खलित मराठी बोलतो. इकतच नव्हे तर या जोडप्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणही मराठी माध्यमातूनच केले आहे. त्यांच्या या निर्णयाचं आतापर्यंत सगळीकडूनच कौतुक झालं आहे. 


चिन्मयीने सांगितल्या आठवणी


चिन्मयी सुमित हिने तिच्या आयुष्यातल्या काही गोड आठवणी यावेळी शेअर केल्या आहेत. चिन्मयीचे वडिल IAS ऑफिसर होते. तेव्हाच्या काही गोड आठवणी देखील चिन्मयीने सांगितल्या. यावेळी चिन्मयीने म्हटलं की, 'आएएस ऑफिरसची मुलगी असल्याने आमच्या जवळपास फारसं कुणी यायचं नाही किंवा आमच्यावर फार काही कमेंट्सही व्हायच्या नाहीत. जालनासारख्या शहरामध्ये दादा कलेक्टर म्हणून गेले होते. तिथे गेल्यावर मी म्हटलं की मला शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायचा आहे. तेव्हा मी फक्त आठवीत होते. त्यामुळे तेव्हा कंडिशनर नुकतच कळलं होतं. ते मला घ्यायचंय, असं मी सांगितलं. तेव्हा एक तलाठी पुढे बाईकवर,एक तहसीलदार माझ्यासोबत गाडीमध्ये असे आम्ही गेलो. त्यानंतर मी गाडीतच बसले आणि त्या दुकानदाराने ट्रेमधून सगळे शॅम्पू आणि कंडिशनर पाठवले, जे हवंय ते सिलेक्ट करुन घ्या असं त्याने मला सांगितलं.' 


मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा - चिन्मयी सुमित


पुढे चिन्मयीने म्हटलं की,  'मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. तेव्हा मी ताडताड करत घरी आले आणि दादांना सांगितलं, की मला दुकानात जायचं होतं आणि त्यांनी मला असं केलं खाली उतरु दिलं नाही. तेव्हा दादांनी त्यांना सांगितलं की, माझ्या मुली तुम्हाला नॉर्मल वाटत असतील, पण त्या तश्या नाहीयेत.  यापुढे त्यांना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट वैगरे देऊ नका, गाडी वैगरेही नका देऊ. त्यांच्या त्या जातील आणि येतील.' 


ही बातमी वाचा : 


Paresh Raval : 'नाला साफ करण्याचं कामही माझंच का?' परेश रावल खासदार असताना लोकसभेत घडला भन्नाट किस्सा, श्रीरंग बारणेंनी सांगितला अनुभव