एक्स्प्लोर

Saif Ali Khan:चाकू हल्ल्याला वर्ष उलटलं, पण सैफ अजूनही हादरलेला; म्हणाले, 'आजही मला चाकू पाहिला की ...'

सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची 'हैवान' ही फिल्म नुकतीच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली आहे.

Saif Ali Khan: जानेवारी 2025 मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांच्या घरात एका व्यक्तीने हल्ला केला होता. चाकू घेऊन हा व्यक्ती त्यांच्या घरात शिरला होता. या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता.या घटनेला आता जवळपास एक वर्ष झालं आहे. मात्र, एका मुलाखतीत सैफने सांगितलं की, तो अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. कुटुंब या घटनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. मात्र, आता चाकू दिसला तरी तो वेगळ्या प्रकारे व्यक्त होत असल्याचं तो म्हणाला.

घटनेच्या आठवणी अजूनही सैफच्या मनात

'बॉम्बे टाइम्स'शी बोलताना सैफ अली खान म्हणाला, "आम्ही ही घटना खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. माझ्या मते, माझ्या पत्नीवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. ती खूप संवेदनशील आहे. आम्ही यातून लवकर सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना खरोखरच खूप भयावह होती."सैफ पुढे म्हणाला की, तो अजूनही या घटनेतून पूर्णपणे बाहेर आलेला नाही. "मी अजूनही पूर्णपणे सावरलेलो नाही. कारण जेव्हा मला चाकू दिसतो, तेव्हा मला थोडी भीती वाटते," असं त्याने सांगितलं.

'चाकू तुटला नसता तर...'

हल्ल्यादरम्यान वापरण्यात आलेल्या चाकूबद्दल बोलताना सैफने आपण किती नशीबवान होतो, याची जाणीव अजूनही असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, त्या चाकूचा एक भाग तुटला, हे मोठं नशीब होतं. असं सैफने सांगितलं. तो म्हणाला, "हा चाकू हल्ल्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होता. त्याच्याकडे रॅम्बोसारखा खरा चाकू असता, तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो. तो कुठेही भोसकला जाऊ शकतो. मला शरीराच्या अनेक ठिकाणी दुखापत झाली, पण त्याने मला गंभीरपणे भेदलं नाही. माझ्या नशिबावर माझाच विश्वास बसत नाही."

हल्लेखोराला माफ करण्याची सैफची तयारी

या घटनेनंतरही सैफ अली खानने हल्लेखोराला माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच्या मते, अशा घटना अनेकदा आर्थिक विषमता आणि पैशांच्या कमतरतेमुळे घडतात. हल्लेखोराला आपण नेमकं कुठे आलो आहोत किंवा काय करत आहोत, याची कल्पनाही नसावी, असं सैफने म्हटलं.दरम्यान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची 'हैवान' ही फिल्म नुकतीच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाने आतापर्यंत 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Wankhede: 'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Ashok Saraf: 'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल; स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन
'बहुतेक माझ्यावर धाड'; अशोक सराफ यांचा Lamborghini कारमधील VIDEO व्हायरल; स्वत:च्याच व्हिडीओवर मामांनी सोडलं मौन
Abhijeet Kelkar SRA: मुंबईतील SRA विरोधात मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट; अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, बिल्डरविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव
मुंबईतील SRA विरोधात मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट; अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, बिल्डरविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव
Varsha Usgaonkar: 'हिंदीमध्ये मी खूप जास्त चित्रपट करू शकले असते'; वर्षा उसगावकर यांनी बोलून दाखवली खंत, सांगितला किस्सा
'हिंदीमध्ये मी खूप जास्त चित्रपट करू शकले असते'; वर्षा उसगावकर यांनी बोलून दाखवली खंत, सांगितला किस्सा
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Embed widget