Saif Ali Khan Injured: बॉलिवूड (Bollywood Actor) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) रात्री उशिरा त्याच्या मुंबईतील (Mumbai News) घरी चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत सैफ गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफला तातडीनं उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सैफवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे.
सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत आता त्याची पत्नी करिना कपूर खान हिनं अधिकृत निवेदन जारी केलं आहे. करिना कपूर खानच्या टीमनं घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं की, "काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली होती, ज्यासाठी तो रुग्णालयात आहे, त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती ठीक आहे. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी धीर धरावा आणि पोलीस प्रकरणाची योग्य चौकशी करत असल्यानं कुणीही अधिक आणि चुकीचे अंदाज लावून गैरसमज पसरवू नयेत. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार."
मध्यरात्री सैफच्या घरात नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील मदतनीश महिलेशी वाद घालू लागला. जेव्हा अभिनेत्यानं मध्यस्थी करून तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केलं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सैफची प्रकृती कशी?
सैफ अली खानला सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या निवेदनानुसार, सैफ अली खानला पहाटे 3 ते 3.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी अभिनेत्याला 6 जखमा झाल्या होत्या. त्यापैकी एक त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ होती." लीलावती हॉस्पिटलचे सीईओ नीरज उत्मानी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, "सैफ अली खान यांना पहाटे 3 ते 3.30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झालेल्या, त्यापैकी दोन गंभीर आहेत. एक दुखापत त्यांच्या मणक्याजवळ आहे."
दरम्यान, सैफ अली खान यापूर्वी 'देवारा पार्ट 1' मधील भूमिकेनं चाहत्यांची मनं जिंकली. कोराताला शिवा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआर यांनी भूमिका साकारल्या होत्या. यानंतर, जयदीप अहलावतसोबत 'ज्वेल थीफ'मध्येही सैफ झळकणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होईल.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Security Guard : सैफ अली खानच्या घरी काय घडलं? सुरक्षा रक्षक नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :