Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्यानं देशभरात खळबळ माजली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं रात्री घरात घुसून अभिनेत्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला. त्यानंतर सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. अशातच सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं. आता पोलिसांनी फ्लोअर पॉलिशिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी दोन ते तीन दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशींगचं काम सुरू होतं. पोलिसांकडून या कामगारांचीही सखोल चौकशी करण्यात आली असून आता अधिक चौकशीसाठी या कामगारांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचं सीसीटिव्ही तपासल्यानंतर मिळालेल्या काही लीड्सच्या आधारावर तपास सुरू केला आहे. यामध्ये फ्लोरिंग पॉलिशिंग करणाऱ्या कामगारांची कसून चौकशी केली जाणार आहे.
पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी सैफच्या घराच्या आसपासचं सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासलं, पण कुणीच संशयित येताना-जाताना दिसलेला नाही. त्यामुळे आरोपी आधीपासूनच इमारतीच्या आवारात उपस्थित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 7 टीम दाखल
सैल अली खान हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला असून तपासाठी पोलिसांना सात टीम दाखल झाल्या आहेत. महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात हल्लेखोर घरात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली असून या आरोपीनं मदतनीसावर हल्ला केला. आणि या वादात सैफमध्ये पडला यातून सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वांद्रेमधील राहत्या घरात त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावतीत शस्त्रक्रिया झाली असून चाकून त्याच्यावर 6 वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये त्याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आले आहेत. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आलं असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :