Saif Ali Khan Injured: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे (Bandra) इथल्या राहत्या घरी चाकूहल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घरात शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या वेळी एका अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफवर उपचार सुरू असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 


वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर काल रात्री मध्यरात्री चाकू हल्ला झाला. अज्ञाता व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या व्यक्तीनं तब्बल दोन ते तीनवेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे. चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या व्यक्तीनं दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे. 


मध्यरात्री सैफच्या घरात नेमकं घडलं काय? 


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर वांद्रे येथे राहतात. याच घरात रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली. धक्कादायक बाब म्हणजे, सैफची लहान मुलं ज्या रुममध्ये झोपलेली, त्याच रुमच्या बाल्कनीमधून त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या रुममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. 


सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता. त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने-सामने आले. त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्रानं सैफवर वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 


सैफच्या मानेवर वार, पाठीत धारदार शस्त्र घुपसलं 


अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सैफच्या मावेर तब्बल 10 सेमीची जखम झाली आहे. सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं वार केले. सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं. पाठीत घुपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार