मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सैफ अली खान वरील हल्ला धक्कादयक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं. या घटनेमुळं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते. सलमान खानला आज बुलेट प्रुफ घरात राहावं लागत आहे. बाबा सिद्दिकींचा खून होतो, लॉरेन्स बिश्नोई गँगला ब्लेम केलं जातं, बिल्डर लॉबीला काही म्हटलं जात नाही हे झिशान सिद्दीकीनं म्हटलं आहे.  आता आज सैफ अली खान सोबत घटना घडलीय, तिन्ही घटना वांद्रेमध्ये झाल्या आहेत, तिन्ही घटना नामांकित व्यक्तींबाबत झाल्या आहेत. हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे. 90 च्या दशकात दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला होता तसाच प्रयत्न आता आहे, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं.


मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तिला संपवण्याचा प्रयत्न आहे, उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. वांद्रेमधील आमदार आहेत, इतक्या घटना घडल्या तरी दखल घेतली जात नाही हे चुकीचं आहे, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. 


वांद्रेसारख्या भागात सर्वाधिक सेलिब्रेटी राहतात,तिथं कायदा व सुव्यवस्था इतर भागांपेक्षा चांगली आहे. मात्र, तिथेच या घटना घडत आहेत. यावरुन मुंबईत काय संदेश जात आहे. बाबा सिद्दिकीच्या कुटुंबाला न्याय मिळाला, तर नाही मिळाली. सलमान खानला खुलेपणानं जीवन जगता येत नाही. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला आपल्याकडे सोपवण्याची मागणी गुजरात पोलिसांकडे केली नाही, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. 


गृहमंत्र्यांनी जागरुक व्हावं, राजकारण कमी करुन त्यांच्या कामात लक्ष द्यावं. ज्या प्रकारे घटना घडत आहेत त्यातून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होतील. कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करा.मुंबई पोलिस आयुक्तांकडून जबाबदारी निश्चित करुन घ्या, असं प्रियांका चतुर्वेदींनी म्हटलं. 


सैफ अली खानवर तातडीनं शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. मात्र, तो अजून शुद्धीवर आला नसल्याची माहिती आहे. सैफ अली खान शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्याचा जबाब घेतील.  धारधार शस्त्रानं सैफ अली खानवर सहावेळा वार करण्यात आला. त्यापैकी दोन वार त्याच्या शरीरावर लागल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. लीलावती रुग्णालयात करीना कपूर खान रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाणार आहे. वांद्रे  परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईला हादरवण्याऱ्या घटना घडल्याचं पाहायला मिळतंय.  या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का? असा सवाल उपस्थित होत आहे.



इतर बातम्या: