Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attacked) याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्री (16 जानेवरी)ला मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या राहत्या निवासस्थानी सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केले. सदर घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी आठ टीम, तर वांद्रे पोलीस स्टेशनने हल्लेखोरांच्या शोधासाठी याआधीच सात टीम तयार केल्या आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


सैफ अली खानच्या घराच्या इमारतीत दोन लिफ्ट आहेत. यातील एक लिफ्ट फक्त सैफ अली खानच्या कुटंबीयांसाठी आहे. खासगी लिफ्टमधून थेट घरातच प्रवेश होतो. तसेच ऍक्सेस कार्डशिवाय खासगी लिफ्ट उघडत नाही. त्यामुळे ऍक्सेस कार्ड नसताना हल्लेखोर घरात कसा गेला असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. तसेच सैफ अली खानच्या घरी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमकडून घरातल्या विविध भागातून बोटाचे ठसे घेण्यात आले. सैफ अली खानवर घरातील ज्या खोलीत हल्ला झाला. त्या खोलीची तपासणी देखील फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येत आहे. फॉरेन्सिककडून सर्व लहान-सहान पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. 


सैफ अली खानवर हल्ला झाला, त्यामागील शक्यता काय?


1. महिला मदतनीसाला भेटायला ती व्यक्ती आली होती, अज्ञात व्यक्तीने आधी त्या मदतनीसावर हल्ल्याचा प्रयत्न केला. दोघांच्या वादात पडल्याने सैफ अली खानवरही हल्ला झाला.


2. मुंबई पोलिसांचा संशय..व्यक्ती कदाचित ओळखीमधलीच असावी. आसपासच्या बिल्डिंगमधे कामाला येत असावी. पोलीस अधिकृतरित्या माहिती देत नसले तरी पोलिसांना हा संशय आहे.


3.  सैफचा लहान मुलगा जहांगिरच्या खोलीत रात्री 2 वाजताच्या सुमाराला अज्ञात व्यक्ती आली असावी. त्यांची हाऊसकीपर आरियामा उर्फ लीमा हिला त्या व्यक्तीने पकडलं असावं आणि तिच्या आरडाओरड्यामुळे सैफ अली खान तिथे पोहचला असावा. त्याव्यक्तीने झटापटीत सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला असावा. ज्यामधे सैफ अली खान आणि ती हाऊसकीपर जखमी झाली असावी. त्यानंतर सैफ अली खानने स्वतः पोलिसांना फोन केल्याची माहिती आणि त्यानंतर सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात एडमिट केल्याची माहिती आहे. 


सैफच्या घरी फॉरेन्सिक टीम, घरातल्या विविध भागातून बोटाचे ठसे घेतले, VIDEO: 



संबंधित बातमी:


Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!


Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच