एक्स्प्लोर

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, धमालमस्ती आणि गमतीजमती...; 'सहल' सिनेमाचा ट्रेलर लाँच, 'नाळ' फेम देविका दफ्तरदार मुख्य भूमिकेत

Sahal Marathi Movie: एका शाळेतील मुलांची गणपतीपुळे येथे सहल जाणार असते. या सहलीला जाण्यासाठी पैसे द्यावे लागणार असतात. मात्र, या शाळेतील मुलांमध्ये असणारे अंतर्गत संघर्ष, विशेषतः मुलींवरून असणारे वादविवाद, सहलीसाठी पैसे देण्यास पालकांचा विरोध अशा कथासूत्रावर 'सहल' हा चित्रपट बेतला आहे.

Sahal Marathi Movie: शाळेची सहल (Sahal Upcoming Movie) म्हणजे धमालमस्ती आणि गमतीजमती... शाळेच्या सहलीशी संबंधित एक मनोरंजक कथा 'सहल' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर येत आहे. सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, 9 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर असून, सहनिर्माते मुकुंद वसंत खुपेरकर आहेत. मूळ पटकथा मुकुंद वसंत खुपेरकर यांनी लिहिली आहे. 'सहल'मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील, रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर याचे या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य नायक म्हणून पदार्पण असून त्याने याआधी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला' ह्यामध्ये लहान राणाच्या भावाची म्हणजेच  सुरजची भुमिका साकारली होती, तसेच डॉ केशव हेगडेवार ह्यांची बाल भुमिका ही साकारली होती.चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यानी केले असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे. सुहास मुंढे,  समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याच्या आवाजात चित्रपटातील गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे. मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता, श्रेया चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन, तर प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

एका शाळेतील मुलांची गणपतीपुळे येथे सहल जाणार असते. या सहलीला जाण्यासाठी पैसे द्यावे लागणार असतात. मात्र, या शाळेतील मुलांमध्ये असणारे अंतर्गत संघर्ष, विशेषतः मुलींवरून असणारे वादविवाद, सहलीसाठी पैसे देण्यास पालकांचा विरोध अशा कथासूत्रावर 'सहल' हा चित्रपट बेतला आहे. आज पालक असलेल्यांना त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारी ही गोष्ट आहे. एका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये त्याचे पालक, शिक्षक आणि अर्थात संभोवतालचे वातावरण यागोष्टी महत्वपूर्ण असतात. शाळेत असतानाच निरागसपणा, समज-गैरसमज, त्या वयातला उत्साह, मुलीनं बाबतचे आकर्षण हे सगळंच या गोष्टीतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. उत्तम कथानकाला दमदार अभिनयाची जोड आहे. त्यामुळे या सहलीचा अनुभव लक्षात राहणारा ठरेल. त्यासाठी आता 9 ऑक्टोबरपर्यंतच वाट पहावी लागणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget