एक्स्प्लोर

Sachin Pilgaonkar: ट्रोलर्समुळे मला जाहिराती मिळतायत .. सचिन पिळगावकरांचं सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला चोख उत्तर, काय म्हणाले?

आताचा काळ असाय की तुम्हाला विचार करून व्यक्त होणं भागच आहे. तुम्हाला तुमचे शब्द निवडावे लागतात. पण याचा अर्थ दुसऱ्याच्या टर्मने जगावं असा होत नाही, असे ते म्हणाले.

Sachin Pilgaonkar on trollers: मनोरंजन विश्वात कधी एखाद्याचं कौतुक होईल आणि कधी ट्रोलिंग होईल हे सांगणं महाकठीण. मराठी मनोरंजनसृष्टीत कित्येक कलाकार कोणत्या न कोणत्या कारणाने ट्रॉल होतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते सचिन पिळगावकर चांगलेच चर्चेत आहेत. मुलाखतींमुळे, त्यांच्या वक्तव्यामुळे सचिन पिळगावकर कायम ट्रॉल होताना दिसतात. त्यांच्या ट्रॉलिंगवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण आता अभिनेते सचिन पिळगावकर पहिल्यांदाच ट्रॉलिंगला उत्तर दिलंय. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत ते सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर बोललेत. 

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या रिॲलिटी शोचे चौथे पर्व सुरु होणार आहे. पुन्हा एकदा अभिनेते सचिन पिळगावकर आणि गायिका वैशाली सामंत सुरांची जादू अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या निमित्ताने अभिनेते सचिन पिळगावकर आणि गायिका वैशाली सामंत यांनी रेडिओ सिटीला मुलाखत दिली. 

काय म्हणाले सचिन पिळगावकर?

रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले," आताचा काळ असाय की तुम्हाला विचार करून व्यक्त होणं भागच आहे. तुम्हाला तुमचे शब्द निवडावे लागतात. पण याचा अर्थ दुसऱ्याच्या टर्मने जगावं असा होत नाही. स्वतःचं आयुष्य त्यागून नाही जगायचं. लोकं वेगळी असतात. त्यांना वेगळं असण्याचा हक्क आहे. पण त्यात जर तुम्हाला कोणी विचारलं तर उत्तर दया ना, पटत नाही म्हणून .. सिनेमा बघून ' हा सिनेमा मला आवडला नाही. या सिनेमातलं तुमचं काम मला आवडलं नाही.' हे बोलण्याचा तुम्हाला हक्क आहे . आमच्या वैयक्तिक आयुष्यात पडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण आम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पडत नाहीत. लोकांना हे कळत नाही हा आपला विषय नाही. त्याकडे लक्ष दिलं तर आपलाच वेळ फुकट जाईल.

शाहरुखचे ते उत्तर प्रचंड आवडलेलं 

" प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्तंय. काळजी करण्याची गरज तेव्हा निर्माण होईल जेव्हा ही संख्या कमी होईल. शाहरुखला एकदा विचारलं गेलं होतं. जेव्हा त्याच्यावर प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग झालं. या सगळ्याचा त्रास होत नाही का असं विचारल्यावर तो म्हणाला होता, की ज्या व्यक्तींना आयुष्यात कसलंही काम केलं नाही, तो व्यक्ती मला ट्रोल करून रात्री शांतपणे झोपतोय. आणि विचार करतोय की मी खूप मोठं काम केलं. तर त्याच्या झोपेचं कारण मी आहे. त्यासाठी मी आनंदी आहे.

ट्रॉलर्समुळे मला ॲड मिळतात 

"ट्रोलर्स या सगळ्यातून पैसेही कमवत असतील कदाचीत. पण ठीक आहे. कमवू दे त्यांना. माझ्यासारख्या व्यक्तीला जो 65 वं वर्ष पूर्ण करतोय या 31 डिसेंबरला करियरचं. माझ्या करियरच्या 65 व्या वर्षी जर मी ट्रोलर्सला इतका महत्त्वाचा वाटत असेल तर याहून जास्त मला काय पाहिजे. करिअरच्या 65 व्या वर्षी मला अटेंशन मिळतंय . सोशल मीडियावर मी आता इतका पॉप्युलर आहे की त्यामुळे मला भरपूर ऍड्स मिळत आहेत. ठीक आहे ना. आपण बदल आहे.या सगळ्यातली नकारात्मकता आपण बाजूला ठेवू. कारण ती आपण बदलू शकत नाही. त्या दिशेने जायचं नाही. तू मजा करो मे भी मजा करता हूं."

ट्रोलिंग करणाऱ्या पोरांना आशीर्वाद

"ही ट्रोलिंग करणारी जी पोरं आहेत, खूप छान वाटतं ही मुलं आहेत. ही सगळी पोरं असल्यामुळे मी त्यांना भरभरून आशीर्वाद देतो .त्यांचा आयुष्यात भलं व्हावं. ते आयुष्यात खूप मोठे व्हावेत . पण ते मोठे कधी होतील जेव्हा ते दुसऱ्याच्या नावाला जितका आता महत्व देतात तेवढे स्वतःच्या नावाला देतील.आणि काहीतरी करतील. तेव्हा त्यांचं नाव होईल असा माझा त्यांना आशीर्वाद आहे.काही काही पोरांना वाटतं की मी त्यांच्याच वयाचा आहे. त्यांना माहीतच नाही की मी 63 - 65 वयाचा आहे. यामुळे एका अर्थी ही माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे असं मी समजतो." असं सचिन पिळगावकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Embed widget