एक्स्प्लोर

Saawan Kumar Tak : प्रसिद्ध चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saawan Kumar Tak : चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार ते सलमान खान अशा सर्व मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते.

Saawan Kumar Tak : प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एबीपी न्यूजला याबाबत माहिती देताना सावन कुमार यांचे पुतणे आणि चित्रपट निर्माते नवीन टाक यांनी सांगितले की, "डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले."

नवीन टाक यांनी एबीपी न्यूजला पुढे सांगितले की,"86 वर्षीय सावन कुमार टाक हे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता आणि त्यांना ताप येत होता. आम्हाला वाटले की त्यांना न्यूमोनिया झाला असावा, पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांना पूर्ण नुकसान झाल्याचे आढळून आले. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेले सावन कुमारही नीट काम करत नव्हते. अशा स्थितीत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती."

चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी संजीव कुमार ते सलमान खान अशा सर्व मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. सावन कुमार टाक यांनी निर्माता म्हणून पहिला चित्रपट 'नौनिहाल' बनवला, ज्यामध्ये संजीव कुमार यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. सावन कुमार टाक यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट बनवला. हा चित्रपट 1972 मध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाचे नाव गोमती के किन होते. संजीव कुमार, मीना कुमारी यांच्याशिवाय त्यांनी राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान अशा सर्व बड्या स्टार्ससोबत काम करून अनेक हिट चित्रपट दिले.

अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती :

सावन कुमार टाक यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. यामध्ये हवास, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा, खलनायका, माँ, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का तुकडा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सावन कुमार हे महिलांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते. 

प्रसिद्ध चित्रपटांसाठी लिहिली गाणी :

सावन कुमार टाक लिखित आणि शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्यावर चित्रित केलेले सबक (1973) चित्रपटातील 'बरखा रानी जरा जमके बरसो', सावन कुमार टाक दिग्दर्शित 'सौतन (1983) है' या चित्रपटातील 'जिंदगी प्यार का गीत' आणि त्यांचे गाणे त्यांच्या 'हवस' या चित्रपटात त्यांनी लिहिलेले 'तेरी गल्ली में ना रहेंगे कदम' खूप गाजले. सावन कुमार टाक यांना हृतिक रोशनचा नायक म्हणून डेब्यू चित्रपट, कहो ना प्यार है (2000) साठी काही गाणी लिहिण्याचे श्रेय देखील दिले जाते.

सावन कुमार टाक यांचे पुतणे नवीन टाक यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, त्यांच्या मामावर आज अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यासाठी तयारी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Saawan Kumar Tak : ‘सनम बेवफा’ फेम प्रसिद्ध निर्माते सावन कुमार टाक यांची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Rajshekhar Shares Post: विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
विद्यानंद बापटांइतकी नसेल, तरी माझीही मातृभाषा चांगलीय, मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची खाज; मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टनं खळबळ
Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Mangesh Desai Emotional Post For Son: मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट
मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
Embed widget