एक्स्प्लोर

एसपी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक, भेटीसाठी दवाखान्यात पोहोचले कमल हासन

गायक एस.पी. बालसुब्रमण्यम(S P Balasubrahmanyam) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चेन्नई : प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. कालांतराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत आहेतच. पण आता मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संगीतसृष्टीतले अनेक मान्यवर ते यातून बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत.

एसपी बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल.. एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं आहे. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आहे.

सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.

एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. यात भारताला त्याची ओळख पटली ती हमसे है मुकाबला या सिनेमातून. यात त्यांनी प्रभूदेवाच्या भावाची भूमिका केली आहे. अत्यंत नम्र, मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget