Hindi-South Indian Film Alliances : काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये (South Movies) काम करणे किंवा पदापर्ण करत असल्याचे सांगितले. तर त्याच्या मोठ्या बातम्या होत होत्या. वृत्तसंस्थांना चांगल्या हेडिंग मिळत होत्या. दरम्यान, आता सिनेसृष्टीत मोठे स्थित्यंतर घडलय. त्यामुळे हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेक्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. टिव्हीच्या माध्यमातून देशभरात आणि खासकरुन हिंदी पट्ट्यात तामिळ आणि तेलगू भाषेतील सिनेमांची क्रेझ वाढली. दाक्षिणात्य सिनेमा हिंदीमध्ये डब करण्याचे प्रमाण देखील वाढले. त्यामुळे सध्या सुरु झालेला दाक्षिणात्य आणि हिंदी कलाकारांचा काँबो तिकिट खिडकीवर हिट ठरताना दिसतोय. RRR, जवान (Jawan) यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
दाक्षिणात्य सिनेमातील थ्रिल आणि सस्पेंस अनुभवण्यासाठी उत्तर आणि मध्य भारतातील प्रेक्षकही चित्रपटगृहांत हजेरी लावू लागले. दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती वाढत गेली. दरम्यान, त्यानंतर निर्मात्यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांना एकाच सिनेमात अभिनय काम करण्याची अपेक्षा व्यक्त करत काम सुरु केले. हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांच्या काँबोला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे.
कुमार अॅटलीचा 'जवान'
बॉलिवूडचा किंगखान शारुख, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपती आणि नयनतारा यांच्या जवान सिनेमाला कुमार अॅटलीचं दिग्दर्शन लाभलं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंप्पर कमाई केली. जवानने तब्बल 1100 कोटींची कमाई केली. तर दाक्षिणात्य अभिनेता यश, संजय दत्त आणि रविना टंडन यांनी 'KGF: Chapter 2 लाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. हा सिनेमाही 1 हजार कोटींच्या जवळ पोहोचला.
RRR मध्ये आलीया, ज्युनियर एनटीआर आणि राम चरणचा धमाका
दिग्दर्शक राजा मौली यांचा RRR हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलीया भट आणि दाक्षिणात्य अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण एकत्रित पाहायला मिळाले. या सिनेमाचाही तुफान चर्चा रंगल्या होत्या. एकंदरीत हिंदी आणि साऊथ अभिनेत्यांचा काँबो बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसतोय.
कॅटरिना आणि विजय सेथुपतीचा 'मेरी ख्रिसमस'
जवान, RRR च्या अभूतपूर्व यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेथुपती यांचा मेरी ख्रिसमस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमानाला उत्तर आणि दक्षिण भारतातून मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सिनेक्षेत्रात दाक्षिणात्य आणि हिंदी कलाकारांचा काँबो तिकिट खिडकीवर हिट ठरताना दिसतोय.
इतर महत्वाच्या बातम्या