Rakul Preet Singh and Jackky Bhagnani :भिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान दोघांच्या विवाहाबाबत आता मोठी बातमी समोर आलीये. भारतात नाही तर विदेशात जाऊन विवाह करण्याचा रकुल आणि जॅकीचा प्लॅन होता. मात्र, डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलचं ठिकाणे निवडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. त्यानंतर लगेच दोघांनी विवाह स्थळाबाबत मोठा निर्णय घेतलाय. रुकुल (Rakul Preet Singh) आणि जॅकी आता भारतातचं लग्न उरकरणार आहेत. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न उरकणार आहेत. याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


रकुल आणि जॅकीला विदेशात जाऊन करायचा होता विवाह


रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विदेशात जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल आणि जॅकीचा प्लॅन होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी महत्वपूर्ण असलेल्या लोकेशनबाबत भाष्य केले. त्यानंतर पीएम मोदींनी याबाबत लोकांना आवाहन देखील केले. पीएम मोदींनी आवाहन करताच रकुल आणि जॅकीने विवाहस्थळ बदलले आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, मिडल ईस्टमध्ये जाऊन विवाहबंधनात अडकण्याचा रकुल प्रीतचा प्लॅन होता. 6 महिने विचार करुन तिने योजना आखली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पीएम मोदींनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातीलच ठिकाणे निवडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळ रकुल आणि जॅकीने आता भारतातच विवाह करण्याच निर्णय घेतला आहे. 


ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी रिलेशनबाबत केला होता खुलासा 


अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. दोघेही एकत्र असल्याची त्यांनी सोशल मीडियावरुन अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर रकुल आणि जॅकी अनेक पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत. आता दोघेही  21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात लग्न उरकणार आहेत. मात्र, दोघांनीही लग्न कोठे आणि कधी उरकरणार याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. 






 


इतर महत्वाची बातमी 


Shoaib Malik On Third Marriage : तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकलेला शोएब मलिक बेधडक बोलला!