(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RRR ची जादू कायम, 98 सेकंदात सगळीच तिकिटं विकली, पाहा कुठं झाला विक्रम
RRR In USA: एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची क्रेझ कायम आहे... अवघ्या 98 सेकंदात चित्रपटाची संपूर्ण तिकिटं विकली गेली.
RRR New Record: एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची जादू संपूर्ण जगभरात पसरली आहे. जगभरातील प्रेक्षकांनी आरआरआर या चित्रपटाला डोक्यावर घेतलेय. अमेरिकेतील थिएटरमध्ये 'RRR' सिनेमाच्या तिकिटांसाठी फक्त 98 सेकंदात हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. लॉस एंजेलिसच्या चायनीज थिएटरमध्ये आरआरआर चित्रपटाचा शो होता. या शो ची 932 तिकिटं अवघ्या 98 सेकंदात विकली गेला. असा प्रकार याआधी कधीही झाला नव्हता, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
9 जानेवारी रोजी आरआरआर हा चित्रपट अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या चायनीज थिएटरमध्ये टीसीएल आयमॅक्स थिएटरमध्ये रिलिज होणार आहे. त्यासाठी आज तिकिटविक्री सुरु झाली होती. अवघ्या 98 सेकंदात 932 तिकिटं विकली गेली आहे. हा एक विक्रम असल्याचं आयोजकांनी म्हटलेय.
आयबाबात बियॉन्ड फेस्ट यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "हे अधिकृत आणि एतिहासिक आहे. @RRRMovie ने 98 सेकंदात @ChineseTheatres @IMAX सर्व तिकिटं विकली गेली. भारतीय चित्रपटाला याआधी कधीही इतका प्रतिसाद मिळाला नाही. धन्यवाद @ssrajamouli @AlwaysRamCharan @MMKeeravani.“
It's official and it's historic. @RRRMovie sold out the @ChineseTheatres @IMAX in 98 seconds. There has never been a screening like this of an Indian film before because there has never been a film like RRR before. Thank you @ssrajamouli @tarak9999 @AlwaysRamCharan @mmkeeravaani pic.twitter.com/GjR0s6A6b1
— Beyond Fest (@BeyondFest) January 4, 2023
अमेरिकेत आरआरआरचा डंका -
अमेरिकेत आरआरआरचा डंका वाजणे सुरुच आहे. प्रसिद्ध व्हराईटी मॅगझिनच्या संभाव्य ऑस्कर विजेत्यांच्या यादीत आरआरआरला मानाचं स्थान मिळालं आहे. 11 विभागात आरआरआरचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या ऑनरेबल मेन्शन्समध्ये विल स्मिथ, ह्यू जॅकमन यांच्यासोबत ज्यूनिअर एनटीआर याचंही नाव आहे. आरआरआरचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलने दिलेला पुरस्कार राजामौलींनी टाळ्यांच्या गजरात स्वीकारला..स्क्रीनिंग गोल्डन ग्लोब्स 2023 मध्ये एसएस राजामौली, राम चरण, जूनियर एनटीआर यांच्यासोबत संगीतकार एमएम कीरावनी सहभागी होणार आहेत.
#ManOfMassesNTR
— jagadeeshchowdary (@jagadee86071428) January 5, 2023
For the first time in Indian history an Indian actor entered in Top10 Oscars Prediction List @tarak9999 💥💥💥💥#RRRMovie #RRR #RRRForOscars pic.twitter.com/rJmNQF6ijR
आणखी वाचा: