Lara Dutta COVID 19 positive : गेल्या काही दिवसांमध्ये काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं तिचं वांद्रा येथील घर सील केलं आहे. तसेच लाराच्या घराबाहेर मुंबई महापालिकेकडून मायक्रो कन्टेन्मेंट झोनचा फलक लावण्यात आला आहे. 


काल (25 मार्च) लारा दत्ताचे घर सील करण्यात आले. रिपोर्टनुसार, लाराच्या कुटुंबात केवळ लारालाच कोरोनाचा लागण झाली आहे. 


हिककप्स आणि हुकअप्स वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस
काही दिवसांपूर्वी हिककप्स आणि हुकअप्स या वेब सीरिजमधून लारा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच  हंड्रेड आणि कौन बनेगी शिखरवती या सीरिजमध्ये लाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  






बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 


हेही वाचा:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha