एक्स्प्लोर

Raja Shivaji Movie Trailer: रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्रीत दणक्यात पदार्पण; 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार दमदार भूमिका

Raja Shivaji Movie Trailer: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली.

Raja Shivaji Movie Trailer: केवळ मराठी सिनेसृष्टीच (Marathi Film Industry) नाहीतर, बॉलिवूड (Bollywood News) आणि टॉलिवूडमध्येही (Tollywood News) ज्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगलेली, तो सिनेमा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या भव्यदिव्य सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तसा टीझर रिलीज (Raja Shivaji Teaser) झाल्यापासूनच सिनेमाच्या ट्रेलरबाबत जोरदार चर्चा रंगलेली. या सिनेमाचं दिग्दर्शन, सिनेमातली स्टारकास्ट (Raja Shivaji Starcast), सिनेमाचे संवाद याबाबतही चर्चा सुरू होत्या. अशातच आता या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाचा ट्रेलर पाहून देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच, आता प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली. रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यानं दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा सिनेमा महाराष्ट्राचं दैवत आणि शूर, पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात 'हिंदवी स्वराज्य' स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेनं प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सिनेमात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आलंय. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

'राजा शिवाजी'च्या निमित्तानं रितेश आणि जिनेलियाच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. या सिनेमात रितेश-जिनेलिया स्वतः झळकणार आहेतच, पण त्यासोबतच त्यांचा धाकटा लेकही सिनेमात झळकणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्री पदार्पण 

'राजा शिवाजी' हा सिनेमा रितेश देशमुख आणि जिनेलिया यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरला आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शनही स्वतः रितेश देशमुख यानंच केलंय. तर, जिनेलिया या सिनेमात महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. पण, हा सिनेमा आणखी एका कारणानं रितेश-जिनेलियासाठी खास ठरलाय. या सिनेमातून रितेशचा धाकटा मुलगा राहिल देशमुख (Rahyl Deshmukh) हादेखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.  


Raja Shivaji Movie Trailer: रितेश-जिनेलियाच्या धाकट्या लेकाचं इंडस्ट्रीत दणक्यात पदार्पण; 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार दमदार भूमिका

ट्रेलर लॉन्चवेळी दिग्दर्शक, मुख्य अभिनेता, लेखक आणि निर्माता रितेश विलासराव देशमुख म्हणाला की, "जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची आणि महानतेची व्याप्ती शब्दांत मांडणं खरोखरंच कठीण होतं. त्यांच्याबद्दलचा आपला आदर, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना ते नेहमीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटते. गेल्या दहा वर्षांपासून मी 'राजा शिवाजी' हा सिनेमा साकार करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर 2023 मध्ये जेव्हा आम्ही या प्रवासाची सुरुवात केली, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. जणू खुद्द महाराजच सांगत होते, "आता तुझी वेळ आली आहे..." कारण केवळ स्वप्न पाहून गोष्टी साकार होत नाहीत, त्यांना वास्तवात आणण्यासाठी भक्कम पाठिंबा आणि विश्वासाची गरज असते. तसेच 'जिओ स्टुडिओज' आणि ज्योती देशपांडे यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते धाडस दाखवले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते, त्याचा मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. एक संपूर्ण टीम म्हणून, आम्ही हा चित्रपट महाराजांच्या चरणी एक विनम्र अर्पण म्हणून सादर करत आहोत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget