एक्स्प्लोर

Riteish Deshmukh Raja Shivaji Advance Booking: 'आपला राजा, आपला अभिमान'; रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू

Riteish Deshmukh Raja Shivaji Advance Booking: ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे 'राजा शिवाजी' हा सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक ठरत आहे.

Riteish Deshmukh Raja Shivaji Advance Booking: 'जिओ स्टुडिओज' (Jio Studios) आणि 'मुंबई फिल्म कंपनी' (Mumbai Film Company) प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक सिनेमा 'राजा शिवाजी'च्या (Raja Shivaji Movie) प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असताना आता सिनेमाच्या मराठी आवृत्तीचं ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आलंय. या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie Released Date) हा सिनेमा यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक ठरत आहे. 

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यांनी या चित्रपटाचे नेतृत्व केले असून, त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवचरित्रावर आधारित असलेला हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा मांडत नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच इतिहास आणि स्वाभिमानाच्या मुळाशी असलेल्या या भव्य चित्रपटानुभवासाठी  प्रेक्षक आपल्या जागांचे आरक्षण आताच निश्चित करू शकतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

'राजा शिवाजी'मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची प्रभावी उपस्थिती पाहायला मिळणार आहे. संजय दत्त (Sunjay Dutt), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), विद्या बालन (Vidya Balan), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), सचिन खेडेकर (Sachin Khedekar), बोमन इराणी (Boman Irani), भाग्यश्री (Bhagyashree), फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांचा भव्य संच या चित्रपटाला अधिक मोठेपणा प्रदान करतो. या कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच भव्य सेट्स, उत्कृष्ट तांत्रिक मांडणी आणि प्रभावी दृश्यरचना यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

'जिओ स्टुडिओज'द्वारे सादर करण्यात आलेला आणि 'मुंबई फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेला हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासावर आधारित हा ऐतिहासिक सिनेमा शौर्य, नेतृत्त्व, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणारा ठरणार आहे. इतिहासाच्या भव्यतेला आणि भावनिक गाभ्याला मोठ्या पडद्यावर साकारत हा चित्रपट प्रेक्षकांना एका प्रेरणादायी आणि नेत्रदीपक सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. 

'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानं आता प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्याची संधी मिळाली आहे. भव्यता, भावनिक ओढ, नेत्रदीपक दृश्ये आणि इतिहासाचा अभिमान यांचा संगम असलेला 'राजा शिवाजी' प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय चित्रपटानुभव ठरणार आहे.

पाहा ट्रेलर : 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Riteish Deshmukh Raja Shivaji: '...हा दिग्दर्शन करणार? बघू काय दिवे लावतो...', रितेश देशमुख यानं सांगितलं दिग्दर्शक होण्याच्या निर्णयामागचं 'ते' मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget