एक्स्प्लोर

होय, महाराष्ट्रात मराठीच; मुंबईत मराठी सक्तीच्या प्रश्नावर रितेश देशमुख रोखठोक, म्हणाला, प्रताप सरनाईकांचा निर्णय योग्य

Riteish Deshmukh: रितेशने लहानपणी केलेल्या वडिलांसोबतच्या एसटी प्रवासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.मराठी अनिवार्य करण्याचा मुद्द्यावरही त्याने स्पष्टपणे आपलं मत मांडलंय.  

Riteish Deshmukh on Ambassador MSRTC:एकीकडे राज्यातील रिक्षाचालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात टॅक्सी आणि ऑटो चालक संघटना संप पुकारत आहेत. दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST बसचा ब्रँड अँबेसिडर म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया दोशमुख यांची नियुक्ती केलीय . अधिकृत घोषणा झाल्यानंतर, अभिनेता रितेश देशमुख याने ST Bus आणि वडिलांसोबत म्हणजेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत लहानपणी केलेल्या प्रवासाच्या काही आठवणीही सगळ्यांशी शेअर केल्या. मराठी अनिवार्य करण्याचा मुद्द्यावरही त्याने स्पष्टपणे आपलं मत मांडलंय. महाराष्ट्रात मराठी अनिवार्य केलीच पाहिजे असं म्हणत त्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय.   (Riteish Deshmukh on Taxi Driver Strike On Marathi Compulsion)

काय म्हणाला रितेश देशमुख? 

रितेश म्हणाला, " सर्वप्रथम मी प्रतापजींचा आभारी आहे. त्यांनी माझी आणि जेनेलिया यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली. खरंतर मी लहानपणी माझ्या वडिलांसोबत प्रवास केलाय. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एसटीमधून झालेला आहे.  परिवहन खातंही त्यांनी सांभाळलं आहे. कुठेतरी जाऊन मला वाटतं की ST बस ही माझ्या लहानपणाचा एक भाग होती. त्यात एसटीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून मी आज नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे.माझ्या आणि जेनेलियाच्यापरिने  जे काही सहकार्य करण्याची गरज असेल ते आम्ही करण्यास तयार आहोत. "

रिक्षा Taxi चालकांच्या मराठी सक्तीवर म्हणाला..

सध्या सुरू असलेल्या रिक्षाने टॅक्सीच्या मराठी भाषेच्या सत्तेवरून सुरू असलेल्या आंदोलनावर ही रितेशने आपलं स्पष्ट मत मांडलं. तो म्हणाला ' महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. जे कोणी प्रवास करणारे मराठी भाषिक असतात. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य बोलली पाहिजे. त्याचप्रकारे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे ' असा रितेशने सांगितले. 

वडिलांसोबतचा रितेशचा ST प्रवास

रितेशने लहानपणी केलेल्या वडिलांसोबतच्या एसटी प्रवासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, "लहानपणी साहेब लातूर, पुणे इतर भागांमध्ये एसटीने जायचे. नेहमी आल्यावर आम्हाला सांगायचे, कसे दोरी ओढायचे, कसे पैसे आम्ही द्यायचो. जो प्रवास त्यांनी पाहिलाय तोच आम्ही त्यांच्यासोबत लहान असताना केला आहे. त्यांचा अजूनही एक फोटो बाभळगावमध्ये आहे .  यात ते ST च्या आत बसले आहेत. तो फोटो आमच्या संपूर्ण परिवाराच्या अत्यंत जवळचा फोटो आहे. बसमध्ये साहेब जिथे बसले होते ते त्यांच्या आवडती जागा होती. ती होती खिडकीत बसण्याची जागा. एका बाजूने वारं यायचं, आणि झोप लागायची तिथे." ते सांगताना रितेश जुन्या आठवणींमध्ये रमून गेला होता. त्याने जेनेलियाचाही  बस प्रवासाचा अनुभव सांगितला,  म्हणाला, " जेनेलियाने मुंबईच्या बसमध्ये प्रवास केलाय. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे त्या एसटी बसने फिरू शकला नाही.

तो पुढे म्हणाला, "प्रतापजींच्या  व्हिजनमधून जी नर्व क्रांती घडतेय,  नव्या, इलेक्ट्रिक बसेस सुद्धा जोडल्या जाणार आहेत. पुढे जाऊन सगळ्या  ST बस इलेक्ट्रिक करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. ड्रिंक अँड ड्राईव्ह ही फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो. किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात. त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमूळं आहे. नियमांचे पालन आपण व्यवस्थित करत नाही. "  असं रितेश देशमुख म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Lock Upp: 52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget