एक्स्प्लोर

रितेशने रियाला ‘सोडू का?’ विचारताच जिनिलियाचा चेहराच बदलला! बॉलिवूड पार्टीतील व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांची चर्चा, नेमकं घडलं काय?

Ritesh Genelia Viral Video: यानंतर घडलेला प्रसंगही चर्चेचा विषय ठरतोय. रियाने आधी जिनिलियाला जाऊन मिठी मारली, मात्र जिनिलियाचा प्रतिसाद फारसा उत्साही नव्हता.

Ritesh Genelia: बॉलिवूडमधील सर्वात लाडकं आणि नेहमीच चर्चेत असलेलं कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा. (Ritesh Genelia)  सोशल मीडियावर त्यांच्या मस्तीखोर पोस्ट्स, क्यूट व्हिडीओ आणि कार्यक्रमांमधील त्यांची बॉन्डिंग कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही हे दोघं एकमेकांचा हात धरूनच दिसतात. मात्र, सध्या या गोड जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून, त्यात जिनिलियाचे भाव पाहून नेटकरी चांगलेच चर्चा करत आहेत. हा व्हिडीओ एका बॉलिवूड पार्टीचा आहे, जिथे रितेश, जिनिलिया आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती एकत्र दिसत आहेत. पार्टी संपल्यानंतर बाहेर पडताना रिया तिथे रितेश-जिनिलियाला भेटली.

रितेश आणि रिया यांच्यात थोड्या गप्पा सुरू असताना रियाने आपल्याकडे गाडी नसल्याचं सांगितलं. यावर रितेशने सहजतेने, “मी तुला सोडू का?” असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच जिनिलियाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. ती अस्वस्थ आणि नाराज झालेली स्पष्टपणे दिसत होती. तिचा तो रिअ‍ॅक्शनचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. दरम्यान, रियाने लगेचच “नाही, माझी कार आहे,” असं सांगून विषय संपवला. तरीही रितेश आणि रियामधील संभाषण सुरू असताना जिनिलिया रागाने दोघांकडे पाहत असल्याचं व्हिडीओत दिसतं. हाच भाग सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

यानंतर घडलेला प्रसंगही चर्चेचा विषय ठरतोय. रियाने आधी जिनिलियाला जाऊन मिठी मारली, मात्र जिनिलियाचा प्रतिसाद फारसा उत्साही नव्हता. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही आनंदी भाव दिसत नव्हते. त्यानंतर रियाने रितेशची गळाभेट घेत ‘बाय’ म्हटलं. जाताना रियाने रितेशच्या दाढीला हात लावल्याचा क्षणही व्हिडीओत दिसतो.नंतर जिनिलियानेही रियाला हसत ‘बाय’ केलं, पण त्याआधीचा संपूर्ण प्रसंग आणि जिनिलियाचे बदललेले भाव सगळं काही सांगून गेले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, जिनिलियाच्या एक्सप्रेशन्सवर मजेशीर मीम्सही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चाहत्यांमध्ये या व्हिडीओवरून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget