एक्स्प्लोर

Kantara: 'कांतारा'नं रचला इतिहास, 'केजीएफ'ला पछाडत दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा

'कांतारा' चित्रपटाने 'KGF 1' ला मागे टाकून 'KGF Chapter 2' नंतर कन्नडमधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

Kantara Become 2nd Biggest Kannada Film:  ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रिपोर्टनुसार 'कांतारा' चित्रपटाने 'KGF 1' ला मागे टाकून 'KGF Chapter 2' नंतर कन्नडमधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. दिवाळी वीकेंडमुळे चित्रपटाचे कलेक्शन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 170 कोटींवर पोहोचले आहे.

कांताराने केजीएफ पार्ट वनला मागे टाकले

पिंकविलाच्या वृत्तानुसार, 'कांतारा' चौथा आठवडा संपण्यापूर्वी 200 कोटींचा टप्पा पार करेल. 'कांतारा'ने कर्नाटकमध्ये आतापर्यंत सुमारे 111 कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यापैकी चौथ्या आठवड्यात 14 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, जी 'KGF'च्या पूर्ण चौथ्या आठवड्याच्या दुप्पट आहे. यशच्या 'KGF 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाईचा विक्रम केला होता आणि कन्नडमध्ये कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आजही पहिल्या क्रमांकावर आहे.
 
हिंदीतही कांताराला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद 

कन्नड भाषेतील लोकप्रियता आणि यश पाहून ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. तमिळ आणि तेलगूमध्ये 15 ऑक्टोबर रोजी आणि मल्याळम मध्ये कांतारा 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये आला. हिंदी भाषेतही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.  अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही कोटींची उड्डाणं घेतली आहेत. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले.  

'कांतारा' चित्रपट हा दंतकथा आणि ग्रामदेवतांवरील आदिवासींच्या विश्वासावरील कथा आहे. सिनेमाची कथा रीतिरिवाज आणि परंपरा आधारीत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतसोबतच ऋषभने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची कथा दैवी नर्तक आणि भूत कोला प्रथेवर आधारित आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर चालत आहे.

हे देखील नक्की वाचा- Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दैव नर्तकांना मिळणार मासिक भत्ता

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Embed widget