Rinku Rajguru , Aakash Thosar : मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमी चर्चेत असते. रिंकू वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. रिंकूच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमी पसंती देखील मिळते. रिंकूनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे आता रिंकू एका अभिनेत्याला डेट करत आहे, चर्चा होत आहे.
रिंकू अभिनेता आकाश ठोसरसोबत (Aakash Thosar) डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो रिंकूनं शेअर केले होते. त्यामुळे रिंकू आणि आकाश हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आकाशसोबत चा फोटो शेअर करून रिंकूनं कॅप्शन दिलं, 'खूप खाल्ल यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार.' त्याच बरोबर या फोटोवर 'डिनर डेट' असं स्टिकर देखील रिंकूनं टाकलं आहे.

सैराट चित्रपटातील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकूच्या मेकअप आणि कागर या मराठी चित्रपटांना तर 100, अनपॉज्ड,200 हल्ला हो या हिंदी वेबसीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर आकाश लवकरच झुंड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या
- Nia Sharma : 'पैशांसाठी कराव्या लागतात विणवण्या'; नियानं सांगितला स्ट्रगलचा अनुभव
- Alka Kubal : लेकीसाठी मागवलेल्या दुधाचे पैसे परत करण्यासाठी जेव्हा अलका कुबल अर्ध्या रस्त्यातून परत जातात.. वाचा किस्सा
- Shabana Azmi : 'जावेद अख्तरांपासून लांब रहा'; बोनी कपूर यांचा शबाना आझमींना सल्ला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha