Republic Day 2024 : भारतात शुक्रवारी (दि.26) 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेची (Constitution of India) अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु झाली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस देखील भारतात थाटात साजरा केला जातो. आजच्या दिवशी अनेक जण देशभक्तीपर गीते ऐकतात. सिनेमेही पाहतात. दरम्यान, बॉलिवूडमध्ये (Bollywood) गाजलेले देशभक्तीवर आधारित सिनेमे कोणते? ज्या सिनेमांना लोक आजच्या दिवशी पाहण्यास पसंती देतात?  जाणून घेऊयात...तुम्ही कुटुंबियांसोबत बसून हे देशभक्तीवर आधारित सिनेमे पाहू शकता. यातील काही सिनेमे ओटीटीवर देखील पाहाता येऊ शकतात. तुम्ही हे ५ सिनेमे पाहून 26 जानेवारीचा दिवस साजरा करु शकता. जाणून घेऊयात सिनेमांबद्दल 


1. The Legend of Bhagat Singh


भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित सिनेमा 2002 साली प्रदर्शित झाला होता. अभिनेता अजय देवगणने भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. भगतसिंग यांच्या बालपणापासून फाशी देण्यात येईपर्यंत संपूर्ण घटनाक्रम या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. या सिनेमाला लोकांची तुफान पसंती मिळाली होती. तुम्ही देखील आज हा सिनेमा पाहू शकता. 


2. रंग दे बसंती 


आमिर खानचा रंग दे बसंती या सिनेमाला देखील प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद मिळाल होता. या सिनेमाला पाहून प्रेक्षक प्रचंड भावुकही झाले होते. नॅशनल अवॉर्ड जिंकलेल्या हा सिनेमा तुम्ही ओटीटीवर देखील पाहू शकता. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा सर्वांना पाहता येऊ शकतो.


3. शेरशाह 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा शेरशाह हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्ही हा सिनेमा तुमच्या कुटुंबीयांसोबत पाहू शकता. परवीर चक्राने गौरवण्यात आलेल्या विक्रम बद्रा यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे. विक्रम बद्रा यांचा संपूर्ण या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलाय. शेरशाह हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. 


4. बॉर्डर 


सनी देओल पासून सुनिल शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला बॉर्डर हा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. जेपी दत्ता यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ग्रामीण भागापासून ते शहरातील लोकांपर्यंत बॉर्डर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आजही या सिनेमाचे वेड कमी झालेले नाही. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. 


5. उरी द सर्जिकल स्ट्राईक  


अभिनेता विकी कौशल याचा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंप्पर कमाई केली होती. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. तुम्ही हा सिनेमा देखील आज कुटुंबियांसोबत एकत्रित बसून पाहू शकता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Republic Day 2024 Songs : 'ऐ वतन' ते 'तेरी मिट्टी' पर्यंत, प्रजासत्ताकदिनी ऐका देशभक्तीवर आधारित 'ही' गाजलेली गाणी