Republic Day 2024 Songs : 26 जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. देशाचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले होते. उद्या भारतातील प्रत्येकजण आनंदाने तिरंगा फडकावताना दिसणार आहे. शिवाय, देशभक्तीपर गीतेही सर्वत्र ऐकली जातील. त्यामुळे उद्या कोणते गाणी लोकांना ऐकण्यासाठी आवडतील? कोणत्या देशभक्तीपर गाण्यांना आजवर पसंती मिळाली आहे, हे जाणून घेऊयात...
केसरीमधील 'तेरी मिठ्ठी'
केसरी हा सिनेमा 2019 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील 'तेरी मिठ्ठी' या गाण्याला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. बी प्राक यांनी गायलेले हे गाणे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आहे. हे गाणे देशभक्ती आणि राष्ट्रासाठी संपूर्ण समर्पण देण्यासाठी प्रोत्साहित करते.
राजी सिनेमातील ऐ वतन
मेघना गुलजार यांच्या राजी या सिनेमातील ऐ वतन या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. हे गाणे गुलजार यांनी लिहिले आहे. तर सुनिधी चौहान यांनी गायले आहे.
इंडियावाले आणि चक दे इंडिया
किंगखान शारुखच्या हॅप्पी न्यू इयर या सिनेमातील इंडिया वाले या गाण्यालाही चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हे गाणे लोकांना प्रोत्साहित करते. विशाल ददलानी, केके, शंकर महादेवन आणि नीती मोहन यांच्या आवाजातील या गाण्याला चाहत्यांना तुफान प्रतिसाद दिलाय. याशिवाय शारुख खानच्या चक दे इंडिया सिनेमातील गाणेही प्रेक्षकांना आवडले होते. आजही या गाण्याचे प्रेम कमी झालेले नाही.
संदेसे आते है
सनी देओलच्या बॉर्डर या सिनेमातील 'संदेसे आते हैं' हे सध्याच्या घडीला जुने झाले असले तरीही आजही लोकांच्या पसंतीस उतरते. देशभक्तीच्या या गाण्यामुळे लोकांच्या अंगावर शहारे येतात. लोकांना हे गाणे ऐकायला आवडते. या गाण्यांमुळे लोकांचे देशप्रेम जागृत देखील होते.
वंदे मातरम
वरुण धवनच्या 'एबीसीडी 2' या सिनेमातील वंदे मातरम या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या गाण्याला प्रजासत्ताकदिनी तुफान प्रतिसाद मिळत असतो. शिवाय, हे गाणे व्हिडीओ स्वरुपात पाहिले, तरी चांगली उर्जा मिळते. या शिवाय, आय लव्ह माय इंडिया, सला इंडिया, मा तुझे सलाम अशा अनेक हिंदी गाण्यांना प्रजासत्ताकदिना दिवशी तुफान प्रतिसाद मिळतो.
इतर महत्वाच्या बातम्या