एक्स्प्लोर

Rohini Paradhye Husband Social Media Post: माझी चिमणे...रीलस्टार रोहिणी पारध्येने आयुष्याचा दोर कापला; तिसऱ्या दिवशी बायकोसाठी नवऱ्याची पहिली पोस्ट, मनातलं सगळं बोलून गेला!

काहींच्या मते व्यवसायातील तणावामुळे ती नैराश्यात गेली असावी. दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील( Solapur  News) मंगळवेढ्यातील ब्रह्मपुरीमध्ये 25 वर्षीय रीलस्टारच्या संशयास्पद मृत्यूने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. रीलस्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) मृत्यू प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेल्या रीलस्टार रोहिणी पारध्येने गळफास घेत आयुष्य संपवलं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस रोहिणीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत. वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेला तणाव व काही टोकाच्या वादामुळे तिनं हे टोकाचे पाऊल उचललं असू शकतं, असे अंदाज वर्तवले जात असताना रोहिणीच्या नवऱ्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. ' माझी बायको, माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं गं .. ' असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Nilesh Paradhye First Social Media Post)

दरम्यान रोहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल महत्वाची माहिती समोर आलेली. निलेश पाराध्येला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. पहिला लग्नातून विभक्त झाल्यानंतर रोहिणी निलेशला भेटली.  दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, नंतर त्यांनी लग्न केलं. पाच वर्ष दोघांनी सुखाने संसार केला, पण नंतर रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा झाली. रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर तिचा पती निलेश पाराध्येने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Rohini Paradhye Husband Post: रोहिणी पाराध्येच्या नवऱ्याची पहिली पोस्ट

माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.

आज चांगले दिवस यायला लागले होते... आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता... पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस.आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं.चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय.तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ᴀɴᴜ💓ɴɪʟ (@nilesh_paradhye)

Rohini Paradhye: मंगळवेढ्यातील रीलस्टारची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत हॉटेल ग्रामपंचायत चालवणारी रीलस्टार रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावर रिल्स करायची. अनेकदा हॉटेलच्या स्वयंपाक घरातून केलेल्या रील्समुळे अनेकांना खळखळून हसू यायचं. पण त्याच स्वयंपाक घरात पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत तिने जीव संपवला. नेहमी हसत खेळत राहणाऱ्या रोहिणीने टोकाचे पाऊल का उचललं ? ती कसल्या नैराश्यात होती? पती-पत्नीमध्ये मतभेद होते का?कौटुंबिक अडचणी होत्या का ?अशा अनेक कारणांची चर्चा होत आहे. तिच्या मृत्यूचा ठोस कारण समोर आलेलं नाही. मात्र अलीकडे हॉटेल ग्रामपंचायतीच्या सुरू झालेल्या आणखी दोन शाखा आणि कामाचा वाढता ताण यामुळे दोघांमधील वाद वाढल्याचे बोलले जात होतं. काहींच्या मते व्यवसायातील तणावामुळे ती नैराश्यात गेली असावी. दरम्यान पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा:

Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: रोहिणी पाराध्येनं स्वतःच्याच हॉटेलच्या स्वयंपाकघरात आयुष्य संपवलं; सासऱ्यांनी त्या दिवशी काय-काय घडलं, सगळं सांगितलं...

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget