Ravindra Mahajani : दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांना 2020 या वर्षासाठी मरणोत्तर व्ही.शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार प्रदान केला. अभिनेता गष्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने यावेळी वडिल रविंद्र महाजनी यांचा हा सन्मान स्विकारला. वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच 2021 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि वर्ष 2022 साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचा व्ही. शांताराण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 


काही दिवसांपूर्वी रविंद्र महाजनी यांचे निधन झाले.  पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात वयाच्या 77 व्या वर्षी रविंद्र महाजनी यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टींवर चर्चा देखील झाल्या. यामध्ये विशेषत: गष्मीरच्या मुलगा म्हणून भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण नंतर त्याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. रविंद्र महाजनी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रात रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र सरकारकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


रविंद्र महाजनींचा प्रवास पुस्तकातून उलगडणार


रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन (Madhavi Mahajani) यांनी आपले आत्मचरित्र  लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत.


'मुंबईचा फौजदार'मधून घराघरात पोहोचले महाजनी


रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती. 


ही बातमी वाचा : 


Ashok Saraf : 'रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील', ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण प्रदान