Cinema Lovers Day 2024: आज 23 फेब्रुवारी. आजचा दिवस हा सिनेमा प्रेमी दिन (Cinema Lovers Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. आजचा दिवस सिनेप्रेमींसाठी खूप खास आहे. कारण आज फक्त 99 रुपयांमध्ये तुम्ही चित्रपटगृहात चित्रपट पाहू शकता. सिनेमा प्रेमी दिनानिमित्त, देशातील आघाडीची मल्टिप्लेक्स साखळी PVR-INOX लिमिटेड ही खास ऑफर घेऊन आली आहे.


राष्ट्रीय चित्रपट दिनानंतर आज चित्रपटप्रेमींसाठी चित्रपटप्रेमी दिन साजरा केला जात आहे. आजचा फायदा घेत सिनेप्रेमींना केवळ 99  रुपयांमध्ये देशातील सर्व भागांतील चित्रपट पाहता येणार आहेत. देशातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन PVR-INOX लिमिटेड ने ही खास ऑफर आणली आहे. आज सिनेमा प्रेमी दिन साजरा करण्याचे कारण काय? आज देशाच्या कोणत्या भागात तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात. 


का साजरा केला जातो सिनेमा प्रेमी दिन?


गेल्या काही आठवड्यांपासून सुस्त असलेली तिकीट खिडकीला तेजी आणण्यासाठी 23 फेब्रुवारी हा दिवस सिनेमा प्रेमी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत केवळ 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी देऊन सिनेप्रेमींना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले आहे. सवलत पाहून मोठ्या संख्येनं प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचतील आणि या उत्सवात सहभागी होतील.


99 रुपयांमध्ये कोणते चित्रपट पाहता येतील


तुम्ही मल्टिप्लेक्स चेनमधून प्रत्येक मुख्य प्रवाहातील चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकता. या दिवशी प्रीमियम सिनेमा फॉरमॅट आणि रिक्लिनर सीटवरही मोठी सूट उपलब्ध आहे. 


बॉलीवूड चित्रपट


कलम 370 
तेरी बातों में ऐसा उलझा जिया
फायटर
क्रॅक
ऑल इंडिया रँक


हॉलीवूड चित्रपट


होल्डओव्हर्स
बॉब मार्ले-वन लव्ह
मीन गर्ल्स
द टीचर्स लाउंज
मॅडम वेब


ही ऑफर देशाच्या या भागांमध्ये उपलब्ध असणार 


आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची ही ऑफर देशातील कोणत्या भागात असणार आहे? तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडिचेरी ही दक्षिणेकडील राज्ये वगळता 99 रुपयांची ही विशेष ऑफर देशभरात लागू आहे.


महत्वाच्या बातम्या:


Oppenheimer On OTT : ओटीटीवर रिलीज होणार 'ओपनहायमर'; कुठं मोफत पाहता येणार नोलनचा ब्लॉकबस्टर चित्रपट