Ravi Kishan on viral videos: 'प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावंसं वाटेल'; व्हायरल व्हिडीओंवर अभिनेता नेमकं काय म्हणाला?
Ravi Kishan Reacts to Viral Videos: रवि किशन यांनी आपल्या व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं आहे.

Ravi Kishan On Viral videos: सोशल मीडियात सध्या खासदार आणि अभिनेता रवि किशन (Ravi Kishan) यांचाच बोलबाला सुरू आहे. रवि किशन यांचे व्हिडीओ आणि फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा (Social Viral) वर्षाव होत आहे. रवि किशन यांच्या व्हिडीओंनी इंटरनेटवर ताबा मिळवला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रवि किशन यांच्या जुन्या सिनेमातील व्हिडीओही व्हायरल होत आहे. अलिकडेच त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी 'प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावंसं वाटेल', असं म्हणाले आहेत.
व्हायरल व्हिडीओंवर रवि किशन नेमकं काय म्हणाले? (Every Child Would Want to Become Ravi Kishan)
रवि किशन यांच्या मुलाखत असो किंवा त्यांचे जुने चित्रपट, सध्या रवि किशन यांचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अलिकडेच रवि किशन यांनी 'इंडियन एक्सप्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी व्हायरल व्हिडीओंवर भाष्य केलं. मुलाखतीत रवि किशन म्हणाले, 'पैसे कमवा, तुमचे फॉलोअर्स वाढतील. डॉलर्समध्ये पैसे तुम्हाला मिळतात. मला काहीच प्रॉब्लेम नाही. गोरखपूरमध्ये असताना मी असंख्य मुलांना शिकवलं आहे घडवलं आहे. गोरखपूर Universityमध्ये मी शिकवायलाही जातो. मी आर्ट, सिनेमा शिकवायला जातो. अडीच लाख मुलं तिथे शिकतात. मी तिथे प्रोफेसर आहे. मुलं खूप प्ररित होतात'.
'मला म्हणतात की, तुम्ही प्रोफेसर बनण्याचं शिक्षण घेतलं नाही तर, तुम्ही प्रोफेसर कसे झाला? मी त्या विद्यार्थ्यांना म्हणालो की, प्रोफेसरचं शिक्षण घेतलं नाही, तिथे मी सक्सेसफूल झालो नाही. पण जीवनाचे धडे गिरवले, तिथे सक्सेसफूल झालो आहे. ज्याच्यांकडे डिग्री आहे त्या व्यक्तीशी तुम्ही प्ररित होणार की, ज्याकडे डिग्री नाही, त्या व्यक्तीशी तुम्ही प्रेरित होणार?. प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावं असं वाटेल. माझ्यासारखे असे 80 टक्के मुलं आहेत, जे नम्रपणेनं आयुष्य जगत आहेत. एका मातीच्या घरातून आलेल्या रवि किशनला आज संपूर्ण जग ओळखत आहे'.
'रवि किशन आता एक ब्रँड बनला आहे. चांगले व्हिडीओ तयार करा. कमवा, लोकांना एन्टरटेन कला', असं रवि देखील किशन म्हणले. .
महत्त्वाच्या इतर बातम्या:























