Raveena Tandon : अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon)हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने मुलगी राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling)या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. रवीनाची कर्मा कॉलिंग ही वेबसिरीज 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर (Hotstar) ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिने 'इंडिया टुडे' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या वेळी तिने बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत वाढत्या वयामुळे अभिनेत्रींना डाववले जाते. याबाबत भाष्य केले आहे.
'अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना फारच कमी वेतन मिळते' (Ravina Tondon)
"बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना फारच कमी मानधन मिळते. मानधनातील ही असमानता शक्य तितक्या लवकर दूर करण्याची वेळ आली आहे. वयामुळे इंडस्ट्रीमध्ये डावलण्याचा प्रकार वाढलाय. हे मला फारच विचित्र वाटते. या बाबींच्या चर्चा मीडियामध्ये आणल्या जातात. इंडस्ट्रीमध्ये, बंद दाराआड याबद्दल बोलले जाऊ शकते", असे रवीना टंडन म्हणाली आहे.
'अभिनेत्यांच्या वयाबाबत कोणीही आक्षेप घेत नाही' (Ravina Tondon)
मानधनातील तफावतीनंतर रवीनाने आणखी काही आक्षेप घेतले आहेत. रवीना पुढे बोलताना म्हणाली, आमच्या वयाबाबत बोलले जाते. मात्र, अनेक अभिनेत्यांचही वय वाढलेलं आहे, त्यांच्याबाबत कोणीही बोलत नाही. मला, माधुरीला आणि उर्मिला नेहमी वयावरुन टार्गेट केले जाते.
'करीना कपूरने वाढत्या वयावरुन बोलणाऱ्यांना झापलं होतं' (Ravina Tondon)
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या या प्रकारावर रवीना टंडनच्या आधी करिना कपूरनेही भाष्य केलं होतं. वय हा फक्त आकडा आहे, त्यावर चर्चा झाली नाही पाहिजे. तुम्ही पुरुष कलाकारांच्या मागील पिढीला वयाबाबत विचारतात का? मग आमच्या वयाबाबत का बोलले जाते? असा सवाल करिनाने केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या