Animal Movie on OTT : संदीप वांगा रेड्डीने दिग्दर्शित केलेल्या अॅनिमल (Animal) या सिनेमाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली. 'ए' सर्टिफिकिट मिळालेल्या या सिनेमाने टीकाकारांची बोलतीच बंद केली. दरम्यान, आता अॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कधी रिलीज होणार? याबाबत मोठा वाद सुरु आहे. अॅनिमलच्या (Animal) सहनिर्मात्यांपैकी एक असलेल्या 'सिने 1 स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड'ने हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ नये, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) एका याचिका दाखल केली होती. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने टी सिरीज(T-Series) आणि नेटफ्लिक्सला समन्स बजावला आहे.
उच्च न्यायालयाने टी सिरीज आणि नेटफ्लिक्सला बजावला समन्स
न्यायाधीश संजय नरुला यांनी या प्रकरणी टी सिरीज आणि नेटफ्लिक्सविरोधात समन्स जारी केला आहे. यामध्ये त्यांना लिखीत स्वरुपात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी उच्च न्यायालायाने वेळ ठरवून दिली आहे. न्यायाधीश नरुला यांनी निर्देश दिले की, "लिखीत उत्तराबरोबरच 'सिने 1 स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड'ने सादर केलेले दस्तऐवज तुम्हाला मान्य आहेत की नाहीत? याबाबत प्रतिज्ञापत्रक सादर करा. तसे नाही केल्यास लिखित उत्तरास रेकॉर्डवर घेतले जाणार नाही." न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आहे.
ओटीटी रिलीजवरुन वाद सुरुच
अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमल बंप्पर कमाई केली आहे. अॅनिमलने जगभरात एकूण 900 कोटींची कमाई केली आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सिनेमा रिलीज करण्याबाबत वाद सुरुच आहे. 26 जानेवारीला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार होता. मात्र, त्यापूर्वीच सह-निर्माता असल्याचा दावा करणाऱ्या 1 स्टुडिओजने ओटीटीसोबतच आणखी चार प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येऊ नये, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती.
ओटीटी रिलीज थांबवण्याची मागणी कशामुळे?
'सिने1 स्टूडियोज प्राइवेट लिमिटेड'ने सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीवर (टी सिरीज) आरोप केले आहेत. "टी सिरीजने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सिने1 स्टूडियोजने केला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या हिश्श्यातील एकही रुपया मिळालेला नाही." असे आरोप टी सिरीजवर करण्यात आले आहेत. याला टी सिरीजकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याला 2.6 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. याबाबतची माहिती त्यांनी न्यायालयात दिलेली नाही, असे टी सिरीजने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या