एक्स्प्लोर

Dhurandhar: आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?

Dhurandhar TV Premiere Date Out: सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता धुरंधर हा सिनेमा आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे.

Dhurandhar TV Premiere: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'धुरंधर 2' आधी 'धुरंधर' ने बॉक्स ऑफिसवरील बरेच रेकॉर्ड्स मोडले. केवळ भारतच नाही तर, जगभरात या सिनेमाने धुमाकूळ घातला.  सध्या 'धुरंधर 2' सिनेमागृहात धुरळा उडवत आहे. तब्बल 12 दिवसांत या सिनेमानं 12 कोटींचा टप्पा पार केला. दरम्यान, 'धुरंधर' या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. लवकरच हा सिनेमा आता आपल्याला घरबसल्या (TV Premier) पाहता येणार आहे. 

'धुरंधर' हा चित्रपट ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी खरंतर आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल.  आता घरबसल्या पॉपकॉर्नचा आस्वाद घेत 'धुरंधर' या सिनेमाचा आनंद आपण  आपल्या फॅमिलीसोबत लुटू शकता. सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेला  'धुरंधर' आता थेट तुमच्या टीव्ही स्क्रिनवर येत आहे. स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शनशिवाय आपण घरबसल्या टीव्ही स्क्रीनवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. पण हा सिनेमा टीव्हीवर कधी रिलीज होणार? हा प्रश्न सध्या प्रेक्षक वर्गाला पडला आहे.

'धुरंधर' टीव्हीवर कधी आणि कोणत्या चॅनेलवर रिलीज होणार?

'धुरंधर पार्ट 1' हा सिनेमा 2025 या साली सिनेमागृहात रिलीज झाला होता.  डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 30 जानेवारीला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. भारतात या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही.  अखेर, या चित्रपटाचे निर्माते  स्पाय थ्रिलर फिल्म टीव्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हा चित्रपट 30 मे 2026 रोजी, सायंकाळी 7 वाजता स्टार वाहिनीवर प्रीमिअर होणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Gold (@stargoldofficial)

ज्यांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही.  त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 'धुरंधर पार्ट 1' ची घोषणा करताना, स्टार गोल्डने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत एक कॅप्शन देखील दिलं आहे.  'प्रेक्षकांनो आता खरी मज्जा येणार.  धुरंधरचा वर्ल्ड टेलिव्हिजिन प्रीमिअर येत आहे. 30 मे 2026.. सायंकाळी 7 वाजता. फक्त स्टार गोल्डवर..'. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.  कमर्शियली हा सिनेमा हिट ठरला. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार,  धुरंधर या  चित्रपटाने जगभरात 1307.35 कोटींची कमाई केली.  हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून, जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.   रणवीर सिंहसह या चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जून रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जून यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget